शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक कामात वेगळेपण शोधा

By admin | Updated: September 15, 2014 01:00 IST

कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी उत्सुकता महत्त्वाची आहे. ठरविलेले उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास जीवन जगताना प्रत्येक काम वेगळेपणाने करून माहीत असलेल्या चांगल्या गोष्टी अमलात आणल्यास

राजेश खवले : प्रकट मुलाखतीतून उलगडला जीवनप्रवासनागपूर : कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी उत्सुकता महत्त्वाची आहे. ठरविलेले उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास जीवन जगताना प्रत्येक काम वेगळेपणाने करून माहीत असलेल्या चांगल्या गोष्टी अमलात आणल्यास यश पदरात पडते, असे प्रतिपादन यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी आज येथे केले.प्रयास-सेवांकुर, मुंडले एज्युकेशनल ट्रस्ट व अच्युतराव महाजन चॅरिटेबल ट्रस्ट नागपूरच्यावतीने यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन दीक्षाभूमीजवळील द ब्लाईंड रिलिफ असोसिएशनच्या मुंडले सभागृहात करण्यात आले. अविनाश सावजी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत राजेश खवले म्हणाले, बिकट परिस्थितीत गावच्या शाळेत दहावीपर्यंत शिकलो. शेजारच्या गावातील महाविद्यालयात प्रवेश घेऊन बारावी झालो. अमरावतीला बीएला प्रवेश मिळवून वडिलांना कपड्याच्या दुकानात मदत करू लागलो. टेपरेकॉर्डर विकत घेऊन स्वत:च्या आवाजात अनेक कॅसेट रेकॉर्ड केल्या. स्पर्धा परीक्षेचे १० हजार प्रश्न रेकॉर्ड केले. आंघोळीला गेल्यानंतरही टेपरेकॉर्डर लावून तो वेळ वाचवू लागलो. पदवीनंतर पीएसआय, एसटीआयची परिक्षा उत्तीर्ण होऊन मुंबईत नोकरी सुरू केली.तेथे काम करताना एमपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवला. चाळीतल्या वातावरणात, रेल्वेत, आॅफिसच्या फाईलमध्ये अभ्यासाचे कागद ठेवून अभ्यास करायचो. अखेर उपजिल्हाधिकारी संवर्गात महाराष्ट्रातून १० वा मेरिट आलो. आॅडिओ कॅसेटच्या तंत्राचा मोठा लाभ झाला. त्यानंतरही ते तंत्र न सोडता मान्यवरांच्या भाषणांच्या क्लिप तयार केल्या. व्हॉट्स अ‍ॅपवर क्लिप तयार केल्या. प्रशासकीय कामही मन लावून केले. भिलवाडा येथे दारूचा व्यवसाय करणाऱ्यांना उत्पन्नाचे पर्यायी साधन उपलब्ध करून दिले. तेथील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दाखले नसल्यामुळे शिबिराचे आयोजन केले. चिखलदऱ्याला असताना तेथील लोक जाळण्यासाठी लाकडे तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करीत असल्याचे समजल्यानंतर त्यांच्या हातून तहसिल कार्यालयाच्या मागे वृक्ष लावून घेतले. आता तो परिसर चांगलाच हिरवागार झाला आहे. अंधश्रद्धेवर सुद्धा केलेल्या कामाला नरेंद्र दाभोळकरांसारख्या व्यक्तीने पावती दिली. जीवनात माणसाला अनेक चांगल्या बाबी माहीत असतात. परंतु त्या अमलात न आणल्यामुळे माणसाचे नुकसान होते, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी आपल्या कौटुंबिक वातावरणाची माहिती देऊन मुलांना वेळ देण्याचे आवाहन केले. त्यानंतर सभागृहात उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. (प्रतिनिधी)