शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अखेर खडसे झोटिंग समितीसमोर हजर

By admin | Updated: February 15, 2017 03:11 IST

भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीसमोर अखेर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली.

पाऊण तास मांडली बाजू : २१ फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी नागपूर : भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीसमोर अखेर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली. ‘अ‍ॅव्हीडेन्स अ‍ॅफिडेव्हिट’ दाखल केले. या प्रतिज्ञापत्रावर आता सुनावणी होणार आहे. यावर समितीने २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा सुनावणी ठेवली आहे. पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन पदाचा दुरुपयोग करून नातेवाईकांना दिल्याचा आरोप राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आहे. याप्रकरणी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती डी. झोटिंग यांची एक सदस्यीय समिती गठित केली. नागपुरातील रविभवन येथील कॉटेज क्रमांक १३ मधून झोटिंग चौकशी समितीचे कामकाज सुरू आहे. गेल्या सात महिन्यापासून ही समिती चौकशी करीत आहे. यादरम्यान समितीने औद्योगिक विभाग आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांना उत्तर सादर करण्यासाठी ( पान १ वरुन) बोलावण्यात आले होते. दोन्ही विभागाच्या प्रधान सचिवांनीही समितीसमोर हजेरी लावली होती. या चौकशीला होत असलेल्या दिरंगाईवर मुंबई उच्च न्यायालयाने सुुद्धा नाराजी व्यक्त करीत शासनाला चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान, समितीकडून आता उलटतपासणी सुरू करण्यात आली आहे. खडसे, महसूल आणि औद्योगिक विभागाकडून आपापला युक्तिवाद वकिलामार्फत समितीसमोर ठेवण्यात येत आहे. याप्रकरणी खडसेंना उलटतपासणीसाठी नोटीस बजावली असून, समितीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. परंतु आजवर त्यांनी वकिलांमार्फत बाजू मांडल्याने ते स्वत: हजर होतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवारी दुपारी १२ वाजता एकनाथ खडसे हे त्यांचे वकील एम.जी. भांगडे व अ‍ॅड. अमोल पाटील यांच्यासह न्या. झोटिंग समितीच्या कार्यालयात हजर झाले. तब्बल पाऊण तास त्यांनी आपली बाजू मांडली. १२.४० मिनिटांनी ते समितीच्या कार्यालयातून बाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, खडसे यांनी आपल्या साक्षी पुराव्याचे अ‍ॅव्हीडेन्स अ‍ॅफिडेव्हिट सादर केले. यावर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. २१ तारखेलाही एकनाथ खडसे स्वत: उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)