शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यावर अनैसर्गिक शरीरसंबंधाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पोटावर लाथा मारून गर्भपात केल्याच्या, तसेच अनैसर्गिक शरीरसंबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपावरून अजनी पोलिसांनी बुटीबोरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - पोटावर लाथा मारून गर्भपात केल्याच्या, तसेच अनैसर्गिक शरीरसंबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपावरून अजनी पोलिसांनी बुटीबोरी पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायावर गुन्हा दाखल केला. निखिल मधुकर शेगावकर (वय ६०) असे आरोपी पोलिसाचे नाव असून त्याच्यावर आरोप लावणारी त्याची पत्नी आहे.

मिनू (वय २९, नाव काल्पनिक) हिचे आरोपी निखिलसोबत जानेवारी २०१९ मध्ये लग्न झाले होते. लग्नात मनासारखे आंदण आणि हुंडा मिळाला नसल्यामुळे आरोपी पत्नी निखिल तसेच त्याचे नातेवाईक मिनूचा छळ करायचे. तिला टोमणे मारून मारहाणही करायचे. हा छळ करतानाच आरोपी निखिल मिनूला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्याशी अनैसर्गिक शरीरसंबंध जोडायचा. वेदना होत असल्याचे सांगून तिने विरोध केल्यास तो तिला मारहाण करायचा. सासूला हा प्रकार सांगितला, तर ती निखिलला समजावण्याऐवजी सुनेलाच खोटे ठरवायची. दरम्यान तिला गर्भधारणा झाली. तशातही आरोपी निखिलने तिच्या पोटावर लाथा मारून तिचा गर्भ पाडला. विशेष म्हणजे, यानंतरही तिचा छळ सुरूच होता. त्यात सासू, दोन नणंदा आणि नणंदांच्या नवऱ्यांसह सात आरोपींचा सहभाग होता. माहेरच्या मंडळींचाही आरोपी अपमान करीत होते. नणंदेचा नवरा अशांत सोरते याने एकदा तिचा पदर ओढून छातीला हात लावण्याचा प्रयत्न केला आणि तिने ही बाब पती आणि सासूला सांगण्याचा इशारा दिला असता, आरोपी सोरतेने, तुलाच खोटे ठरवून बदनाम करेन, अशी धमकी दिली. तू मला शरीरसुखाची मागणी करतेस, असे तुझ्या नवऱ्याला आणि सासूला सांगेन, नंतर तुझे हाल होतील, अशीही धमकी आरोपींनी दिली. पती, सासू आणि अन्य आरोपींकडून होणारा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याने अखेर मिनूने अजनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी निखिलविरुद्ध अनैसर्गिक कृत्य (अत्याचार) करून गर्भ पाडण्याच्या आरोपाखाली, नंदोई अशांत सोरतेविरुद्ध विनयभंग केल्याच्या तसेच सासू आणि अन्य आरोपींविरुद्ध हुंडयासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली गु्न्हा दाखल केला.

----

शिपाई निखिलवर यापूर्वीही आरोप

आरोपी पोलीस शिपाई निखिलविरुद्ध यापूर्वीही असेच अनेक आरोप झाले आहेत. एका महिला शिपायानेही लैंगिक शोषण आणि चार लाख रुपये हडपल्याचा आरोप लावला होता. या संबंधाने जरीपटका ठाण्यात विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला होता. आरोपीने धाकदपटशा करून अनेकींचे तोंड बंद केल्याची तक्रार आहे.

---