मोदी, शहांविरोधात अपशब्द काढणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 21:03 IST2019-09-24T21:01:30+5:302019-09-24T21:03:30+5:30

मोदी व शहा यांच्याविरोधात अपशब्द काढणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे.

File a case against those who defame Modi, Shah | मोदी, शहांविरोधात अपशब्द काढणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

मोदी, शहांविरोधात अपशब्द काढणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

ठळक मुद्देभाजप महिला आघाडीची पोलीसात तक्रार : कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याच्या ‘पोस्ट’मुळे वाद

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याने ‘सोशल मीडिया’वर केलेल्या ‘पोस्ट’वरुन राजकारण तापले आहे. संबंधित महिला पदाधिकाऱ्याविरोधात भाजप महिला आघाडीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मोदी व शहा यांच्याविरोधात अपशब्द काढणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश, महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस शिल्पा बोडखे यांनी २२ सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदीअमित शहा यांच्याविरोधात ‘ट्विटर’वर अपमानास्पद भाषेत टीका केल्याचा आरोप भाजप महिला आघाडीतर्फे करण्यात आला आहे. या प्रकरणात पदाधिकाऱ्यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. बोडखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील यावेळी लावून धरण्यात आली. यावेळी आ.सुधाकर कोहळे, दक्षिण नागपूर महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रीती राजदेरकर, संजय ठाकरे, दिव्या धुरडे, निता ठाकरे, भारती बुंदे, शितल कामडी, कल्पना कुंभलकर, नेहा लघाटे, वसुधा रणदिवे प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: File a case against those who defame Modi, Shah