शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

विचारांची लढाई विचारांनीच लढावी

By admin | Updated: January 13, 2015 01:08 IST

विचारांची लढाई ही विचारांनीच लढावी. हिंसेने लढू नये. जे कमजोर असतात तेच विचारांची लढाई हिंसेने लढतात आणि त्यातूनच पॅरिससारख्या घटना घडतात, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय

राम माधव : आपली परंपरा ही जीवनदृष्टी नागपूर : विचारांची लढाई ही विचारांनीच लढावी. हिंसेने लढू नये. जे कमजोर असतात तेच विचारांची लढाई हिंसेने लढतात आणि त्यातूनच पॅरिससारख्या घटना घडतात, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी येथे केले. चित्रपटगृहाला पेटवून प्रश्न सुटणार नाही. एखाद्याने आपल्या विरोधात एखादा चित्रपट काढला असेल तर तुम्ही चार चित्रपट काढून त्याला उत्तर द्या. एखाद्याच्या टीकात्मक लेखाला आणखी चार लेख लिहून उत्तर द्या, असे आवाहन करीत या देशातील बुद्धिजीवी लोकांनीसुद्धा यासंबंधात दुतोंडी भूमिका बजावू नये, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. विवेकानंद जयंतीनिमित्त विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्था मर्या.तर्फे सोमवारी सायंकाळी गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात विवेकानंदांचे सामाजिक विचार या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. तर संस्थेचे अध्यक्ष सुधीर दप्तरी, सचिव चंद्रकांत लाखे, सहसचिव अशोक हरदास, उपाध्यक्ष महेश अंधारे व्यासपीठावर होते. राम माधव म्हणाले, आमच्या देशाला प्राचीन परंपरेचा वारसा लाभलेला आहे. आमची परंपरा ही जीवनपद्धत नसून जीवनदृष्टी आहे. ती सार्वकालीन आहे. या देशात अनेक पूजापद्धत प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. परंतु त्या सर्वांची जीवनदृष्टी एकच होती. ही जीवनदृष्टी घेऊनच स्वामी विवेकानंद जागतिक धर्म परिषदेला गेले होते. तिथे त्यांनी सांगितले की, मी त्या देशातून आलो आहे, ज्या देशात सर्व विचारांचा आदर केला जातो. विविधतेचा उत्सव साजरा केला जातो. ही आपली शक्ती आहे. स्वामी विवेकानंदानीसुद्धा म्हटले होते की, आपला धर्म महान आहे, परंतु व्यवहार अनुकूल नाही. हा व्यवहार बदलण्याची गरज आहे. परिवर्तनाची व्यवस्था आमच्यात आहे. जुनी व्यवस्था बदलावी, नवीन व्यवस्था यावी. परंतु हा बदल घडवून आणत असताना संवेदनशीलता असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेप्रास्ताविक विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्थेचे अध्यक्ष सुधीर दप्तरी यांनी केले. सोनाली जोगळेकर यांनी संचालन केले. नेहा दप्तरी यांनी वंदे मातरम् सादर करीत कार्यक्रमाची सांगता केली. (प्रतिनिधी)