शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मस्तीखोरांचा उपद्रवी वाढदिवस, तोंडाला केक लावाला म्हणू बर्थ डे बॉयने मित्राला बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 12:00 IST

बर्थ डे पार्टीत केक तोंडाला का लावला म्हणून एका बर्थ डे बॉयने स्वत:च्या मित्राला बेदम मारहाण केली. तसेच, रागाच्या भरात दारूची बाटलीही डोक्यावर फोडली.

ठळक मुद्देडोक्यावर फोडली दारूची बाटली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाढदिवस सेलिब्रेशनची क्रेज आपल्याकडे आता काही नवीन नाही. मज्जा-मस्ती , गोंधळ-पार्टी अशी काहीशी वाढदिवसाची गमंत असते. वाढदिवस येतो-न-येतो मित्र पार्टी मागणं सुरू करतात. मात्र, कधी-कधी ही मज्जा-मस्ती वादाचं कारणही ठरू शकते, नागपुरातही एका बर्थडे बॅशमध्ये झालेला राडा सध्या चर्चेत आहे. 

आधी बर्थ डे पार्टीत बोलावून मग केक तोंडाला लावला म्हणून एका बर्थ डे बॉयने  स्वत:च्या मित्राला धू-धू धूतले. रविवारी रात्री ९ च्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. रितेश मोतीलाल हिरवानी (२६, रा. डिप्टी सिग्नल) असे या हाणामारीत जखमी झालेल्याचे नाव असून राहुल महामल्ला (१८), संदीप राजेश महामल्ला आणि नरेश महामल्ला अशी आरोपींची नावे आहेत.

राहुलने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मित्रांना आमंत्रित केले. तेथे संदीप राजेश महामल्ला आणि नरेश महामल्ला हे देखील होते. ते सर्व रितेशचे मित्रच आहेत. पार्टीत खाणं-पिणं अगदी जोरात सुरू होतं, त्यात केटकटींगही जोरात झाले. त्यानंतर केक एकमेकांच्या तोंडाला फासणं सुरू झालं. यावेळी रितेशने राहुलच्या तोंडाला केक लावण्याचा प्रयत्न केला मात्र, राहुलने त्याला अडवले. पण मज्जामस्ती म्हणून रितेशने राहुलच्या तोंडाला केक फासलाच! त्यामुळे राहुल चिडला आणि तु केक लावलाच कशाला म्हणत त्याने रितेशला राहुलने रितेशला थापड मारली. 

त्यांच्यात वाद सुरू झाला आणि प्रकरण हातापायीवर गेले, दरम्यान आरोपी संदीप आणि नरेश महामल्लानेही राहुलचा साथ देत दारूची बाटली रितेशच्या डोक्यावर फोडली. नंतर त्याला दांडक्याने बेदम मारहाण केली. यामुळे रितेश गंभीर जखमी झाला. या हाणामारीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच कळमना पोलीस पोहोचले. त्यांनी रितेशच्या तक्रारीवरून आरोपी राहुल, संदीप आणि नरेश या तिघांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी