शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ गरजेचे :सजल मित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:55 IST

मानवी जीवनात खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थी दशेत खेळ महत्त्वाचे असतात. खेळांमुळे शारीरिक व्यायामासोबतच बौद्धिक विकासालाही हातभार लागतो. अभ्यासासाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये क्रीडा सप्ताह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवी जीवनात खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थी दशेत खेळ महत्त्वाचे असतात. खेळांमुळे शारीरिक व्यायामासोबतच बौद्धिक विकासालाही हातभार लागतो. अभ्यासासाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी येथे व्यक्त केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने आयोजित क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. डी. टी. कुंभलकर, स्टुडंट कौन्सिलचे प्रभारी अधिकारी डॉ. अविनाश गावंडे, डॉ. गणेश डाखले, क्रीडामंचचे प्रभारी अधिकारी डॉ. निशिकांत मानकर उपस्थित होते.डॉ. मित्रा यांनी मशाल प्रज्वलित करून सप्ताहाचे उद्घाटन केले. १९ ते २६ मार्चदरम्यान या सप्ताहामधून विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात ‘आऊटडोअर’ व ‘इनडोअर’ खेळ खेळले जातील. ‘आऊटडोअर’ खेळांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल तर ‘इन-डोअर’ खेळांमध्ये बुद्धिबळ, टेबलटेनिस, बॅडमिंटन, कॅरम या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या पूर्वार्धात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयांतर्गत सामने खेळण्यात येतील तर उत्तरार्धात आंतरमहाविद्यालयीन सामने खेळले जातील. या स्पर्धेमध्ये नागपूरसह अमरावती, चंद्रपूर, गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे आयोजनासाठी स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष मयूर श्रीराव, सरचिटणीस शुभम महल्ले, क्रीडामंचचे अध्यक्ष निहाल लव्हाळे यांच्यासह महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाचे (२०१७ बॅच) विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.वसतिगृहांमध्ये असणार विविध क्रीडांची सोयडॉ. मित्रा यांनी सांगितले, मैदानी खेळ हे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी फारच गरजेचे असतात. यामुळेच लवकरच वसतिगृहांमध्ये बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, बास्केटबॉलचे मैदान उभारण्याचा प्रयत्न राहणार आहे.

 

 

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर