शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

एफडीएसमोर ठिय्या आंदोलन

By admin | Updated: July 29, 2014 00:50 IST

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कामठी येथील चार औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द केल्याच्या विरोधात सोमवारी कामठी व कन्हान येथील १००वर औषध विक्रेत्यांनी एफडीए कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

औषध विक्रेत्यांचा कारवाईला विरोध नागपूर : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कामठी येथील चार औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द केल्याच्या विरोधात सोमवारी कामठी व कन्हान येथील १००वर औषध विक्रेत्यांनी एफडीए कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात एफडीएचे सहआयुक्त अशोक गिरी यांना निवेदन देऊन कारवाई मागे घेण्याची मागणी केली.राज्यातच नव्हे तर नागपूर जिल्ह्यात एफडीएच्या औषध दुकानांची तपासणी मोहीम जोरात सुरू आहे. यात त्रुटी आढळणाऱ्या दुकानांचे परवाने तत्काळ रद्द केले जात आहेत. एफडीएने आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ३५९ परवाने रद्द केले आहेत. मागील १० दिवसांपासून एफडीएची चमू कामठी येथील औषध दुकानांची तपासणी करीत आहे. चमूला चंदा मेडिकल स्टोअर्स, हफीज मेडिकल स्टोअर्स, अहमद मेडिकल स्टोअर्स यासह आणखी एका दुकानामध्ये त्रुटी आढळून आल्या. या चारही दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. याविरोधात आ. बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्टस् अ‍ॅण्ड ड्रगिस्टस् असोसिएशनची (एनडीसीडीए) अध्यक्ष रवी गोयल व सचिव गिरीश भट्टड यांच्या मार्गदर्शनात १०० वर औषध विक्रेत्यांनी एफडीए कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सहआयुक्त गिरी यांना निवेदन देण्यात आले. यात परवाने रद्दची कारवाई न करता निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावर गिरी यांनी झालेली कारवाई मागे घेण्याचा प्रस्ताव खात्याच्या मंत्र्यांकडे पाठविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. (प्रतिनिधी)औषध विक्रेत्यांचा बंदऔषध विक्रेत्यांचा परवाना रद्द केल्याच्या निषेधार्थ कामठी, कन्हान, कोराडी व महादुला येथील ३०० च्यावर औषध दुकानदारांनी रविवार व सोमवारी बंद पुकारला होता. या बंदचा फटका रुग्णांना बसला. काहींना नागपुरात येऊन औषध घ्यावे लागल्याचे सांगितले.