शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

९५ लाखांच्या लोभात ४५ हजार गमावले

By admin | Updated: July 13, 2014 00:58 IST

टॉवर उभारणीकरिता केवळ २५० चौरस फूट जागा दिल्यास ९५ लाख रुपये अ‍ॅडव्हॉन्स आणि ९५ हजार रुपये प्रतिमहिना जागेचे भाडे देऊ, असे आमिष दाखवून दोघांनी एका तरुणीचे ४५ हजार रुपये हडपले.

नागपूर : टॉवर उभारणीकरिता केवळ २५० चौरस फूट जागा दिल्यास ९५ लाख रुपये अ‍ॅडव्हॉन्स आणि ९५ हजार रुपये प्रतिमहिना जागेचे भाडे देऊ, असे आमिष दाखवून दोघांनी एका तरुणीचे ४५ हजार रुपये हडपले.प्रियदर्शनी ज्ञानेश्वर ठाकरे (वय २९, रा. सिव्हिल लाईन, नागपूर) यांनी मे २०१४ मध्ये एशिया टॉवर कंपनी लिमिटेडची एक जाहिरात वाचली. टॉवर उभारणीकरिता केवळ २५० चौरस फूट जागा दिल्यास ९५ लाख रुपये अ‍ॅडव्हॉन्स आणि ९५ हजार रुपये प्रतिमहिना जागेचे भाडे मिळेल, असे या जाहिरातीत नमूद होते. त्यामुळे प्रियदर्शनी यांनी जाहिरातीतील नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी आरोपी राहुल कुमार याने जाहिरात खरी असून, तुम्हाला टॉवर लावण्यापूर्वी कंपनीकडे नोंदणी शुल्क (रजिस्ट्रेशन फी) म्हणून एका टॉवरसाठी १५ हजार रुपये कंपनीच्या खात्यात जमा करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार, प्रियदर्शनी यांनी तीन टॉवरसाठी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे ४५ हजार रुपये जमा केले. ४ जूनपर्यंत हा व्यवहार झाला. मात्र, टॉवर काही लागले नाही आणि त्याचा अ‍ॅडव्हॉन्सही मिळाला नाही. स्वत:चे नाव राहुल आणि अजय कुमार सांगणारे आरोपी प्रत्येकवेळी वेगवेगळे कारण सांगून टाळत असल्यामुळे प्रियदर्शनीला संशय आला. नंतर आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी राहुल कुमार, अजय कुमार आणि एशिया टॉवर कंपनीविरुद्ध कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)