नागपुरात अपघातात वडिलांचा मृत्यू, मुली जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 20:30 IST2020-08-17T20:27:17+5:302020-08-17T20:30:17+5:30
कंटेनर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या. रविवारी दुपारी २ च्या सुमारास कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.

नागपुरात अपघातात वडिलांचा मृत्यू, मुली जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कंटेनर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या. रविवारी दुपारी २ च्या सुमारास कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.
कन्हान येथील रहिवासी अरविंद विठ्ठलराव सांबरे हे मुलगी स्नेहा (६ वर्षे) आणि नयना (९ वर्षे) सह कळमन्यात सासऱ्याकडे आले होते. रविवारी दुपारी ते दुचाकीने साईनगरातून कन्हानकडे परत जायला निघाले होते. कळमन्याच्या चिखली चौकात मार्केटजवळ कंटेनर ट्रक चालक आरोपीने सांबरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे खाली पडून तिघेही बापलेक गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्यांनी धाव घेत जखमींना रामदेव बाबा हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. तेथे डॉक्टरांनी अरविंद यांना मृत घोषित केले. स्रेहा आणि नयनाची प्रकृती गंभीर आहे. महिंद्रा विठ्ठलराव सांबरे (वय ३७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपघाताची नोंद केली. आरोपी कंटेनर चालकाची चौकशी सुरू आहे.