शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनी मुलाला दिले जीवनदान

By admin | Updated: January 28, 2017 01:44 IST

मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या ३० वर्षीय मुलाला वडिलांनी स्वत:ची किडनी दान करून जीवनदान दिले.

सुपरमध्ये दहावे किडनी प्रत्यारोपण यशस्वीनागपूर : मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या ३० वर्षीय मुलाला वडिलांनी स्वत:ची किडनी दान करून जीवनदान दिले. बुधवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वडिलांनी दिलेल्या या अवयवाचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. सुपरमधील हे दहावे यशस्वी किडनी प्रत्यारोपण आहे. मुलाला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणणारे फुगुजी भांडारकर (५८) वडिलांचे नाव आहे, तर अनिल भांडारकर मुलाचे नाव. हे कुटुंब मूळ गोंदिया खामरी येथील आहे. अनिल हे मागील एक वर्षापासून डायलिसीसवर होते. वडिलांनी मूत्रपिंड दान करून मुलाला वाचवण्याचा निश्चय केला. यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मदतीला धावून आली. या शस्त्रक्रियेसाठी येणारा सर्व खर्च या योजनेतून करण्यात आला. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी ‘किडनी युनिट’उभारण्याचे प्रयत्न केल्यामुळेच सुपरमध्ये हे शक्य झाले. यशस्वी किडनी प्रत्यारोपणात सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील युरोलॉजिस्ट डॉ. संजय कोलते, डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. समीर चौबे, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. मनीष बलवाणी, डॉ. नीलेश नागदिवे, डॉ. विशाल रामटेके व भूलतज्ज्ञ डॉ. विजय श्रोते यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)मूत्रपिंड दात्याकडून रुग्णालयाला आगळी-वेगळी भेटएकीकडे डॉक्टर व रुग्णांमधील नात्यांमध्ये तडे जात असताना दुसरीकडे शासकीय रुग्णालय असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्यंत गुंतागुंतीच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणात सौहार्दपूर्ण वागणुकीचा अनुभव आल्याने वनमाला उके या मूत्रपिंड दात्याने एलईडी टीव्ही संच नेफ्रोलॉजी विभागाला भेट स्वरूपात दिला. यावेळी रुग्णालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.