मदतीसाठी धावला, मात्र रागाच्या भरात चाकूने वार केले; आई-मुलावर खुनाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 13:24 IST2023-03-22T13:23:34+5:302023-03-22T13:24:19+5:30
अल्पवयीन मुलाने भोसकल्यानंतर जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू

मदतीसाठी धावला, मात्र रागाच्या भरात चाकूने वार केले; आई-मुलावर खुनाचा गुन्हा दाखल
नागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन आईशी भांडण करून तिला शिवीगाळ करीत असलेल्या वडिलांवर १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने चाकूने वार केल्याची घटना दि. ७ मार्चला रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यात उपचारादरम्यान जखमी वडिलांचा मृत्यू झाला असून, कळमना पोलिसांनी आई आणि मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रताप नामदेव कुळमेथे (४०, प्लॉट नं. ३९, शनि मंदिरामागे, बजरंगनगर कळमना) असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर चंदा प्रताप कुळमेथे (३५) आणि १७ वर्षांचा विधी संघर्षग्रस्त बालक अशी आरोपींची नावे आहेत. दि. ७ मार्चला रात्री ९ वाजता प्रताप हा चंदाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत वाद घालत होता. पती-पत्नी एकमेकांना शिवीगाळ करीत असताना प्रतापने भाजी कापण्याचा चाकू घेऊन चंदाला मारण्यासाठी धावला असता चंदाने चाकू ओढल्याने तिच्या हाताला मार लागला. ती ओरडल्यामुळे बाजूच्या खोलीत असलेला तिचा १७ वर्षाचा अल्पवयीन मुलगा मदतीसाठी धावला. रागाच्या भरात त्याने प्रतापच्या पोटावर ३ आणि छातीवर एक वार केले उपचारादरम्यान मेयोत मृत्यू झाला.