शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

गाईमुळे प्राणघातक अपघात, दहा लाख रुपयाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:47 PM

मोकाट गाईमुळे अपघात होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने १० लाख रुपये भरपाई मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देपत्नीची हायकोर्टात धाव : राज्य सरकार, मनपाला नोटीस

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मोकाट गाईमुळे अपघात होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने १० लाख रुपये भरपाई मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकार, वाहतूक विभाग व महानगरपालिका यांना नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.सिमरन रामखिलनानी असे याचिकाकर्त्या पत्नीचे नाव आहे. त्यांचे पती रामकुमार (४६) हे २० जुलै २०१८ रोजी स्कूटर चालवत असताना गिट्टीखदान रोडवर एक मोकाट गाय अचानक आडवी आली. त्यांच्या स्कूटरची गाईला धडक बसली. त्यामुळे रामकुमार रोडवर कोसळून गंभीर जखमी झाले. २६ जुलै रोजी मेयो रुग्णालय येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते जरीपटका येथे किराणा दुकान चालवीत होते. त्यावर त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण अवलंबून होते. रामकुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला हलाखीच्या परिस्थितीत जगावे लागत आहे. त्यांना अल्पवयीन मुलगी व मुलगा आहे. कायद्यानुसार मोकाट जनावरामुळे अपघात झाल्यास जबाबदार प्राधिकरणाने भरपाई देणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिका व वाहतूक विभागाला निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, सिमरन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. शिल्पा गिरटकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAccidentअपघातcowगाय