शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

शेतकऱ्यांनाे, कापूस विकण्याची घाई करू नका; आवक १२.३८ टक्क्यांनी घटली

By सुनील चरपे | Updated: December 13, 2022 18:30 IST

पेरणीक्षेत्र वाढूनही उत्पादन घटण्याचा अंदाज

नागपूर : देशभरातील बाजारात १ ऑक्टाेबर ते ७ डिसेंबर या काळातील कापसाची आवक किमान १२.३८ टक्क्यांनी घटली आहे. या काळात मागील हंगामाच्या तुलनेत किमान ९५ लाख गाठी कापूस देशभरातील बाजारात येणे अपेक्षित असताना ४९ लाख ६७ हजार ७०० गाठी कापूस बाजारात आला आहे. सन २०२१-२२ च्या हंगामात याच काळात ८२ लाख २१ हजार गाठी कापूस बाजारात आला हाेता. यावर्षी कापसाचे पेरणीक्षेत्र १० लाख हेक्टरने वाढले असताना उत्पादन घटण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

सन २०२१-२२ च्या हंगामात (१ ऑक्टाेबर ते १० सप्टेंबर या काळात) देशभरात एकूण ३६२ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज काॅटन असाेसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला हाेता. या काळात बाजारात ३०७.६ लाख गाठी कापसाची आवक झाल्याने ५४.४ लाख गाठी कापसाचे उत्पादन कमी झाल्याचे स्पष्ट झाले.

सन २०२२-२३ च्या हंगामात देशभरात ३७५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज काॅटन असाेसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला हाेता. नंतर ३४५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचे स्पष्ट केले. या हंगामात २९० ते ३०० लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. इतर देशांसाेबतच भारतातही कापसाच्या उत्पादनात घट हाेणार असल्याचे संकेत मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची घाई न करता, टप्प्याटप्प्याने कापूस विकावा व बाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

देशभरातील कापसाची आवक (१ ऑक्टाेबर ते ७ डिसेंबर) (गाठी) राज्य सन-२०२१ सन-२०२२

  • पंजाब - २,७४,००० - ६९,३००
  • हरयाणा - ४,८५,००० - ३,००,०००
  • राजस्थान - १०,३६,००० - ९,३३,०००
  • गुजरात - २१,००,५०० - १५,३५,०००
  • महाराष्ट्र - १७,७३,००० - ६,२७,०००
  • मध्य प्रदेश - ६,६६,००० - ४,०६,०००
  • तेलंगणा - ७,३४,५०० - २,९२,५००
  • आंध्र प्रदेश - ३,३६,००० - ३,१३,८००
  • कर्नाटक - ६,४६,५०० - ४,०४,०००
  • तामिळनाडू - ३१,५०० - ६०,१००
  • ओडिशा - ५१,००० - २७,०००

इतर - ६०,००० - ००,०००एकूण - ८२,२१,००० - ४९,६७,७०००

देशातील कापसाचे पेरणीक्षेत्र (लाख हेक्टरमध्ये)

सन - २०२१-२२ - ११५सन - २०२२-२३ - १२५

शेतकऱ्यांनी ‘स्टाॅकिस्ट’ व्हावे!

आर्थिकदृष्ट्या बाजारातील कापूस साठवणूक क्षमता सध्या संपली आहे. कापसाची आवक वाढल्यास बाजारातील आर्थिक दबाव वाढू शकताे. अशा परिस्थितीत दर काेसळण्याची भीती असते. हा आर्थिक दबाव वाढू नये, यासाठी शेतकऱ्यांनीच स्वत: स्टाॅकिस्ट हाेऊन बाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवणे गरजेचे आहे.

कापसाची मागणी व पुरवठा

एक जिन पूर्ण क्षमतेने चालवायला राेज किमान एक हजार क्विंटल कापसाची आवश्यकता असते. परंतु, राेज १५० ते २०० क्विंटल कापूस मिळत आहे. त्यामुळे आठवड्यातून केवळ एक ते दीड दिवस जिन चालवावा लागताे, अशी माहिती जिनिंग प्रेसिंगच्या मालकांनी दिली.

भारतासाेबत जागतिक पातळीवर कापसाचे उत्पादन कमी हाेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कमी उत्पादनामुळे दर निश्चितच वाढू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता गरजेपुरता कापूस विकावा. उर्वरित कापूस टप्प्याटप्प्याने विकावा.

- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र.

कापसाच्या दरात थोडा चढ-उतार असला तरी दर स्थिर राहतील. आवक वाढली तर दर कोसळतील. सध्या सरकीचे दर कमी झाल्याने कापसाच्या दरावर परिणाम झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी न घाबरता बाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवावी.

- विजय निवल, माजी सदस्य, कॉटन ॲडव्हायझरी बोर्ड.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीagricultureशेती