'ते' कुटुंबासह मुंबईला गेले, इकडे चोरट्याने सोन्या-चांदीचे नाणे पळवून नेले
By दयानंद पाईकराव | Updated: March 30, 2023 13:12 IST2023-03-30T13:10:36+5:302023-03-30T13:12:14+5:30
प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

'ते' कुटुंबासह मुंबईला गेले, इकडे चोरट्याने सोन्या-चांदीचे नाणे पळवून नेले
नागपूर : घराला कुलुप लाऊन कुटुंबासह मुंबईला गेलेल्या व्यक्तीच्या घरातील सोन्या-चांदीचे नाणे आणि बेनटेक्सचे दागिने असा ६६ हजाराचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने पळविल्याची घटना प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
पितांबर वासुदेव अरमोरीकर (६२, गावंडे ले आऊट, प्रतापनगर) हे १० मार्चला सायंकाळी ७ ते २० मार्च सकाळी ८.३० दरम्यान आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबियांसह मुंबईला गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला.
आरोपीने लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे नाणे आणि बेनटेक्सचे दागिने असा एकूण ६६ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. अरमोरीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.