'ते' कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी गेले, इकडे बंद घर फोडून चोरट्याने दागिने पळविले
By दयानंद पाईकराव | Updated: May 23, 2023 14:39 IST2023-05-23T14:38:26+5:302023-05-23T14:39:21+5:30
हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

'ते' कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी गेले, इकडे बंद घर फोडून चोरट्याने दागिने पळविले
नागपूर : देवदर्शनासाठी कुटुंबीयांसह त्र्यंबकेश्वरला गेलेल्या व्यक्तीच्या घरातील ९० हजार रुपयांचे दागीने अज्ञात आरोपीने पळविल्याची घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चक्रपाणीनगर येथे १७ मे रोजी सकाळी आठ ते २२ मे रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान घडली.
राजु श्रावण घोडमारे (वय ५१, रा. प्लॉट नं. ८, माधवी शाळेजवळ, चक्रपाणीनगर) हे कुटुंबीयांसह आपल्या घराला कुलुप लाऊन देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचा कुलुप, कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील सुटकेस व दिवानमधील सोन्याचांदीचे दागीने असा एकुण ९० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वरचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोसे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.