बालाघाटला गेले, चोरट्याने ३.२९ लाखांचे रोख, दागिने नेले

By दयानंद पाईकराव | Updated: October 21, 2023 14:56 IST2023-10-21T14:55:47+5:302023-10-21T14:56:10+5:30

अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

family Went to Balaghat, thief robbed the house and stole cash, jewellery worth 3.29 lakh | बालाघाटला गेले, चोरट्याने ३.२९ लाखांचे रोख, दागिने नेले

बालाघाटला गेले, चोरट्याने ३.२९ लाखांचे रोख, दागिने नेले

नागपूर : घराला कुलुप लाऊन कुटुंबासह नातेवाईकांकडे बालाघाटला गेलेल्या व्यक्तीच्या घरातील रोख आणि दागिने असा एकुण ३.२९ लाखांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेला. ही घटना प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १९ ऑक्टोबरला रात्री ८.१५ ते २० ऑक्टोबरला सकाळी ७.४० दरम्यान घडली.

बालाराम कान्हाजी शरणागत (वय ८०, रा. श्रीनगर परसोडी) हे आपल्या घराच्या मुख्य दाराला कुलुप लाऊन कुटुंबासह बालाघाटला नातेवाईकांकडे गेले होते. अज्ञात आरोपीने संधी साधून त्यांच्या घराच्या मुख्य दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील लोखंडी आलमारीतील सोन्याचांदीचे दागिने व रोख १ लाख रुपये असा एकुण ३ लाख २९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. शरणागत यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Web Title: family Went to Balaghat, thief robbed the house and stole cash, jewellery worth 3.29 lakh