शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

आसमान से गिरा, खजूर पे अटका

By admin | Updated: July 2, 2014 00:59 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभामागील शुक्लकाष्ट संपण्याचे नावच घेत नसल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात हा समारंभ घेण्यात येईल,

नागपूर विद्यापीठ : शंभराव्या दीक्षांत समारंभाबाबत संभ्रम कायमनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभामागील शुक्लकाष्ट संपण्याचे नावच घेत नसल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात हा समारंभ घेण्यात येईल, असा दावा प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी केला होता. परंतु मंगळवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर कुठलीही सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे या मुद्यावरील संभ्रमाचे ढग अजूनही कायमच आहेत. दुसरीकडे प्रवेशबंदीच्या यादीतील ६३ महाविद्यालयांतील नियमबाह्य प्रवेशित विद्यार्थ्यांच्या विशेष परीक्षेचे प्रारूप तयार करण्यास परीक्षा मंडळाने नकार दिला.११७ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनाच्या गुणांच्या वैधतेवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या डॉ.खडक्कार यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल अद्यापही राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यांकनाचे गुण हे नियमानुसार योग्य आहेत की नाही, याचा निर्वाळा विद्यापीठाला द्यायचा होता. मंगळवारी झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. डॉ.संजय खडक्कार समितीचा अहवाल अपूर्ण असल्याची बाब यादरम्यान समोर आली. हा अहवाल जोपर्यंत पूर्ण करण्यात येत नाही तोपर्यंत याला राज्यपालांकडे पाठविण्यात येऊ शकत नाही, असे मत मांडण्यात आले. यासंदर्भात बराच वेळ चर्चा झाल्यानंतर या अहवालासंदर्भात आणखी एक समिती बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती तयार करण्याचे सर्व अधिकार प्रभारी कुलगुरूंना देण्यात आले आहेत. या समितीत नवीन सदस्यांचा समावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अहवाल अपूर्ण का?११७ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसंदर्भात उभ्या झालेल्या वादानंतर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात डॉ.खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले गुण नियमानुसार आहेत की नाही हे निश्चित सांगता येणार नाही, असे समितीच्या चौकशीच्या अगोदरच तत्कालीन कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी राज्यपाल कार्यालयाला कळविले होते. यानंतर डॉ.खडक्कार यांनी चौकशी थांबविली होती व त्यामुळे अहवाल अद्यापही अपूर्ण आहे.(प्रतिनिधी)