शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

नागपुरात तयार होणार ‘फाल्कन’ विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 13:00 IST

येत्या तीन वर्षात फाल्कन-२००० हे एक्झिक्युटिव्ह जेट विमान संपूर्णपणे नागपूरमधील मिहान-एसईझेडमध्ये तयार करण्याची योजना द सॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेडने (डीआरएएल) तयार केली आहे, अशी माहिती एमएडीसीमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देपहिले कॉकपिट शेल द सॉल्ट एव्हिएशनला हस्तांतरित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या तीन वर्षात फाल्कन-२००० हे एक्झिक्युटिव्ह जेट विमान संपूर्णपणे नागपूरमधील मिहान-एसईझेडमध्ये तयार करण्याची योजना द सॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेडने (डीआरएएल) तयार केली आहे, अशी माहिती एमएडीसीमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.यासाठी डीआरएएलने पाच कलमी कार्यक्रम तयार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात कंपनी हँगरचे बांधकाम पूर्ण करून कॉकपिट शेल व नोज कोनचे उत्पादन करणार आहे. डीआरएएलने हा टप्पा पूर्ण केला असून गेल्याच आठवड्यात पहिले कॉकपिट शेल द सॉल्ट एव्हिएशनला हस्तांतरित केले आहे. दुसऱ्या टप्प्यात कंपनी विमानाचे फिन (विमानाला एअरो डायनॅमिक करण्यासाठी बसवले जाणारे पंख) व फिरते पार्टस् (पंखांमधील एलेरॉन्स व फ्लॅप्स) बनवणार आहे. तिसºया टप्प्यात डीआरएएल हॉरीझॉन्टल स्टॅबिलायझिंग असेम्ब्ली (विमानाचे फ्यूजीलाज) खिडक्या असलेले नळकांडे) तयार करणार आहे. चौथ्या टप्प्यात फ्यूजीलाज मेटींग (नळकांडे पंख्यांशी जोडण्याचे काम) होईल व शेवटच्या पाचव्या टप्प्यात विमानाचे इंजिन बसवून सर्व सुटे भाग जोडून विमानाची चाचणी उड्डाणे सुरू होतील व नंतर संपूर्ण फाल्कन विमान द सॉल्टला सोपवले जाईल.दर महिन्याला दोन विमाने तयार करण्याची योजना असून त्यासाठी १.५० लाख चौरस फुटाचे हँगर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर ६५० इंजिनियर्स विमान उत्पादन करतील. यासोबत राफेलचे सुटे भागसुद्धा तयार होऊन फ्रान्सला निर्यात होतील. मिहान-एसईझेडमधील डीआरएलचा हा प्रकल्प एक्झिक्युटिव्ह जेट विमाने व लढावू विमाने बनवणारा जगातील एकमेव कारखाना असेल अशी माहितीही एमएडीसीच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :airplaneविमान