'बालभारती'च्या नावाखाली बनावट पुस्तकांच्या रॅकेटचा भंडाफोड; हिंगणा एमआयडीसीतील प्रिंटिंग प्रेसवर धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:51 IST2025-12-18T18:50:27+5:302025-12-18T18:51:46+5:30

Nagpur : बालभारतीच्या बनावट पुस्तकांच्या छपाई रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. हिंगणा एमआयडीसी येथील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये हा गोरखधंदा सुरू होता.

Fake book racket busted under the name of 'Balbharti'; Raid on printing press in Hingna MIDC | 'बालभारती'च्या नावाखाली बनावट पुस्तकांच्या रॅकेटचा भंडाफोड; हिंगणा एमआयडीसीतील प्रिंटिंग प्रेसवर धाड

Fake book racket busted under the name of 'Balbharti'; Raid on printing press in Hingna MIDC

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
बालभारतीच्या बनावट पुस्तकांच्या छपाई रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. हिंगणा एमआयडीसी येथील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये हा गोरखधंदा सुरू होता. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता तेथे २० हजारांहून अधिक बनावट पुस्तके आढळली. येथून राज्यपातळीवर बनावट पुस्तके पाठविल्या जात होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) दरवर्षी अधिकृत कंत्राटदारांमार्फत शालेय अभ्यासक्रमांची पुस्तके छापली जातात. मात्र, नागपुरातील हिंगणा एमआयडीसी परिसरात बेकायदेशीरपणे बालभारतीच्या पुस्तकांची छपाई सुरू असल्याची माहिती बालभारतीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. बालभारतीचे उत्पादन अधिकारी राकेश पोटदुखे यांच्या माहितीवरून पोलिसांनी हिंगणा एमआयडीसीतील नीलडोहमधील प्लॉट क्रमांक एन-५८ येथील प्रतिभा प्रिंटर्स या प्रेसवर धाड टाकली. तेथे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची सुमारे २० हजारांहून अधिक पुस्तके आढळली. बालभारतीने संबंधित पुस्तकांच्या छपाईचे कंत्राट दुसऱ्या कंत्राटदाराला दिले आहे. मात्र, तरीदेखील प्रतिभा प्रिंटर्सकडून अनधिकृत छपाई करून ती पुस्तके बाजारात आणली जात होती. राकेश पोटदुखे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रिंटिंग प्रेसचा मालक राजेश लांजेवारविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाचा पंचनामा (तपास) केल्यानंतर प्रिंटिंग प्रेसला सील करण्यात आले आहे.

हा तर विद्यार्थ्यांचा विश्वासघात

बालभारतीकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरविण्यात येतात. मात्र, नववी ते बारावीची पुस्तके विद्यार्थ्यांना बाजारातून घ्यावी लागतात. खिशातील पैसे खर्च करणाऱ्या विद्यार्थ्यांना बनावट पुस्तकांची विक्री करणे हा मोठा विश्वासघात असल्याचीच प्रतिक्रिया बालभारतीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

कर्मचारी फरार, मालक ताब्यात

पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच, प्रिंटिंग प्रेसमधील कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेले, तर कारखाना मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या पुस्तकांच्या छपाई आणि विक्रीचे अधिकृत कंत्राट ठाणे येथील एका कंपनीला देण्यात आले होते. पोलिसांनी जप्त केलेल्या पुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणात इयत्ता १० वी गणित आणि १२ वी इंग्रजी पाठ्यपुस्तकांचा जास्त समावेश आहे. अधिकृत पुस्तकांमध्ये सामान्यतः कॉपीराइट लोगो आणि वॉटरमार्क असतात, परंतु जप्त केलेल्या पुस्तकांमध्ये अशा कोणत्याही खुणा नव्हत्या. 

छपाईची ऑर्डर कोणी दिली?

कारखाना मालक राजेश लांजेवार याची चौकशी केली असता त्याने तो केवळ प्रिंटिंग प्रेस चालवत असल्याचे व ऑर्डरनुसारच प्रिंटिंग केले जात असल्याचा दावा केला. त्याला ही ऑर्डर कुणी दिली याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

 

Web Title : फ़र्ज़ी 'बालभारती' पुस्तकों का रैकेट उजागर; हिंगना एमआईडीसी प्रेस पर छापा

Web Summary : नागपुर में फ़र्ज़ी 'बालभारती' पाठ्यपुस्तकों की छपाई का रैकेट पुलिस ने पकड़ा। हिंगना एमआईडीसी में एक छापे में 20,000 से अधिक नकली किताबें मिलीं। प्रेस मालिक हिरासत में, पुलिस ऑर्डर के स्रोत की जांच कर रही है।

Web Title : Fake 'Balbharati' Books Racket Busted; Raid at Hingna MIDC Press

Web Summary : Police busted a racket printing fake 'Balbharati' textbooks in Nagpur. A raid at Hingna MIDC uncovered over 20,000 counterfeit books. The press owner is detained while authorities investigate the printing order's source.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.