शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आग कायद्याच्या वैधतेवर उत्तर सादर करण्यास मनपा अपयशी

By admin | Updated: July 3, 2015 03:15 IST

विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून

हायकोर्ट : १५ जुलैपर्यंत अतिरिक्त वेळ मंजूरनागपूर : विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवनसंरक्षक उपाययोजना कायदा-२००६’च्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले आहे. याप्रकरणात महानगरपालिका न्यायालयाच्या निर्देशान्वये निर्धारित वेळेत उत्तर सादर करण्यात अपयशी ठरली आहे. यामुळे न्यायालयाने याचिकेवर १५ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली असून यादरम्यान उत्तर सादर न केल्यास आणखी वेळ देण्यात येणार नाही असे स्पष्ट केले आहे. ही याचिका २०१३ मध्ये दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवनसंरक्षक उपाययोजना कायदा राज्यघटनेतील अनुच्छेद १४ चे उल्लंघन करणारा आहे. या कायद्याची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. २५ मीटरवर उंचीच्या इमारतींवर मनपाकडून ‘हाय राईज बिल्डिंग फंड’ वसुल करण्यात येत आहे. यासंदर्भात कायद्यात काहीच तरतूद नाही. तसेच, कायद्यात तरतूद असलेल्या आग शुल्कात चारपट वृद्धी करण्यात आली आहे. या वृद्धीला शासनाने मंजुरी दिलेली नसून वृद्धीचा निर्णय घेताना कायदेशीर प्रक्रियेचेही पालन करण्यात आलेले नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. कायदा मागे घेण्यात यावा, याचिका प्रलंबित असताना कायद्याच्या अंमलबजावणीवर स्थगिती देण्यात यावी, कायद्यातील विविध अवैध तरतुदी काढून नवीन तरतुदी टाकण्यात याव्या, महानगरपालिकेतर्फे वसूल करण्यात येत असलेले वाढीव आग शुल्क अवैध घोषित करण्यात यावे अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. दीपेन जग्यासी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)