"चर्चा फक्त मीडियामध्येच", देवेंद्र फडणवीसांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाची शक्यता नाकारली
By कमलेश वानखेडे | Updated: August 2, 2024 17:39 IST2024-08-02T17:27:48+5:302024-08-02T17:39:54+5:30
चर्चा फक्त मिडियामध्येच : राज्यातच काम करण्याचे संकेत

Fadnavis rejected the possibility of becoming the National President of BJP
कमलेश वानखेडे
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वतुर्ळात सुरू आहे. मात्र, फडणवीस यांनी शुक्रवारी नागपुरात ही शक्यता नाकारली. ते म्हणाले, "भाजपचे मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार ही चर्चा मीडियानेच सुरू केली असून ती केवळ मीडियामध्येच आहे. असे काहीही नाही", असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पस्ट केले.
नागपूर जिल्हा नियोजन समितीची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. बैठकीत आलेल्या सर्व नेत्यांमध्येही फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची कुजबूज सुरू होती. पण शेवटी फडणवीस यांनीच या विषयावरील पडदा उचलला. ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यामुळे ते सध्यातरी दिल्लीत जाणार नसून राज्यातच काम करतील हे देखील स्पष्ट झाले आहे.