शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

शैक्षणिक माहिती देणारे खरं प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:48 AM

दहावी आणि बारावीनंतर कुठे आणि कोणते शिक्षण घ्यावे, यावर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. प्रत्येक संस्था वा कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन शुल्क आणि अभ्यासक्रमांची माहिती घेणे हे कठीण काम आहे. पण लोकमतच्या शैक्षणिक प्रदर्शनात महाराष्ट्रातील बहुतांश संस्था, कोचिंग क्लासेस आणि विद्यापीठांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होत असल्यामुळे हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने शैक्षणिक माहिती देणारे परिपूर्ण प्रदर्शन असल्याची प्रतिक्रिया पालक आणि विद्यार्थ्यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना दिली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांची प्रदर्शनाला भेट : आज अखेरचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : दहावी आणि बारावीनंतर कुठे आणि कोणते शिक्षण घ्यावे, यावर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. प्रत्येक संस्था वा कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन शुल्क आणि अभ्यासक्रमांची माहिती घेणे हे कठीण काम आहे. पण लोकमतच्या शैक्षणिक प्रदर्शनात महाराष्ट्रातील बहुतांश संस्था, कोचिंग क्लासेस आणि विद्यापीठांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होत असल्यामुळे हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने शैक्षणिक माहिती देणारे परिपूर्ण प्रदर्शन असल्याची प्रतिक्रिया पालक आणि विद्यार्थ्यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना दिली.महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सहाव्या लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर-२०१८ चे तीन दिवसीय आयोजन शुक्रवार, ८ जूनपासून हॉटेल सेंटर पॉर्इंट, रामदासपेठ येथे सुरू आहे. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांची माहिती जाणून घेण्याची संधी आहे. पालक आणि विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश आहे. १० जून प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे.विविध चर्चासत्रात शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे अनुभव आणि प्रवेश प्रक्रियांची माहिती विद्यार्र्थ्यांना देण्यात येत आहे. भाग्यशाली सोडतीत टॅब भेटस्वरुपात देण्यात येत आहे. प्रदर्शनात अकरावी सायन्स, कॉमर्स, आॅर्ट कॉलेज आणि सायन्स व कॉमर्सच्या कोचिंग क्लासेसची माहिती मिळत आहे. इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय निवडीचे पर्याय आणि देशविदेशातील नामांकित कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया आणि शुल्काची माहिती प्रदर्शनात देण्यात येत आहे. संस्थांसुद्धा विद्यार्थ्यांना करिअरवर योग्य मार्गदर्शन करीत आहेत. शिक्षण आणि करिअरचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे लोकमतचे ‘अ‍ॅस्पायर’ प्रदर्शन सर्वोत्तम असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.प्रशिक डोंगरेने जिंकला टॅबलेटलोकमत अ‍ॅस्पायर प्र्रदर्शनात येणाºया विद्यार्थ्यांसाठी भाग्यशाली सोडतीच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात येत आहे. दुसºया दिवशी म्हाळगीनगर, नागपूर येथील प्रशिक दीपक डोंगरे हे विजेते ठरले आहेत.गुणवंतांचा सत्कारदहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सकाळी ११.३० पासून एक-एक तासाचे पाच चर्चासत्र होणार आहे.आजचे चर्चासत्रसकाळी ११.३० वाजता, विषय : करिअर इन टेक्निकल एज्युकेशन, वक्ते आशिष तायवाडे.दुपारी १२.३० वाजता, बँकिंग आणि दहावीच्या परीक्षेत यश कसे मिळवाल, करिअर कॅम्पसचे सुशांत भगत.सायंकाळी ४.३० वाजता, विषय : यशस्वी करिअरकरिता फाऊंडेशन कसे मजबूत कराल, वक्ते प्रियदर्शनी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अभय शेंडे.सायंकाळी ५.३० वाजता, विषय : ब्यूटी बिझनेसमध्ये करिअर, कुर्झ-द स्कूल आॅफ हेअर अ‍ॅण्ड ब्यूटी.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटnagpurनागपूर