शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्टोबरमध्ये अतिरिक्त पाणी

By admin | Updated: July 12, 2014 02:23 IST

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी साकारण्यात येत असलेल्या पेंच- टप्पा ४ योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.

नागपूर : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी साकारण्यात येत असलेल्या पेंच- टप्पा ४ योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. आॅक्टोबरमध्ये ही योजना पूर्ण होणार असून येथून नागपूरकरांना दररोज अतिरिक्त १२० दलघमी पाणीपुरवठा होईल. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटेल. सोबतच कालव्याद्वारे येणारे पाणी आता मोठ्या जलवाहिनीतून येणार असल्यामुळे वर्षाकाठी तब्बल ८ कोटी रुपयांची बचत होणार आहे.जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांसह कामठी- खैरी, घोगली येथे दौरा करून या प्रकल्पाची पाहणी केली. पेंच जलाशय ते महादुलापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी २३०० मी.मी.ची मोठी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. २७.३१ किलोमीटर लांबीच्या या जलवाहिनीपैकी २६.५० किमीचे काम पूर्ण झाले आहे. फक्त घोगली गावामध्ये ८०० मीटरे प्रलंबित आहे. येथील शेतकऱ्यांशी न्यायालयीन स्तरावर तडजोड सुरू असून १५ दिवसात मार्ग निघण्याची शक्यता आहे. उर्वरित काम फक्त ५ ते ७ टक्के उरले आहे. हे काम दोन महिन्यात पूर्ण होईल, असा दावा कोहळे यांनी केला. दौऱ्यात कार्यकारी अभियंता शाम चव्हाण, अभियंता सुरेश भजे उपस्थित होते. इंटेकवेलचे काम पूर्ण६३० एमएलडीची क्षमता विचारात घेत कामठी-खैरी येथे इंटेकवेल उभारण्यात आली आहे. २२०० मि.मी. व्यासाच्या सिमेंटच्या दोन जलवाहिनी पंपहाऊसपर्यंत टाकण्यात आल्या आहेत. भविष्यातही आंतरग्राही विहिरीमध्ये दुरुस्ती निघाल्यास तिथपर्यंत पोहचण्यासाठी पोहचपूल बांधण्यात आला आहे. (प्रतिनिधी)पंपहाऊसमध्ये आठ पंपइंटेकवेलमध्ये येणारे पाणी पंपहाऊसमध्ये तयार करण्यात आलेल्या साठवणूक टाकीत जमा होईल. त्याला दोन भागात विभागण्यात आले असून एका भागाची स्वच्छता करताना दुसऱ्या भागातून अखंडित पाणीपुरवठा करता येईल. या ठिकाणी आठ पंप उभारण्यात आले आहेत. सहा पंप सतत कार्यरत राहतील. दोन पंप राखीव ठेवले जातील. दोन महिन्यात उरलेली कामे पूर्ण होतील. प्रकल्पाला विलंबया प्रकल्पाचे काम सुमारे तीन वर्षे विलंबाने होत आहे. जून २०१४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र, अद्याप बरीच कामे पूर्ण झालेली नाहीत. यामुळे खर्चात सुमारे २७ कोटींची वाढ झाली आहे. प्रकल्पाच्या कामाची गती वाढविण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले, असे कोहळे यांनी सांगितले.