शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

नागपूरच्या गंगाजमुनातील धाडसी घरफोडीचा भंडाफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 1:53 AM

गंगाजमुनात महिनाभरापूर्वी झालेल्या धाडसी घरफोडीचा छडा लावून आरोपींकडून पावणेनऊ लाखांचा ऐवज जप्त करण्यात लकडगंज पोलिसांनी यश मिळवले.

ठळक मुद्देवारांगनेनी दिली टीप : तडीपार गुंडाच्या टोळीने केला गुन्हा : पावणेनऊ लाखांचा ऐवज जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंगाजमुनात महिनाभरापूर्वी झालेल्या धाडसी घरफोडीचा छडा लावून आरोपींकडून पावणेनऊ लाखांचा ऐवज जप्त करण्यात लकडगंज पोलिसांनी यश मिळवले. विकास ऊर्फ सनी राजकुमार वर्मा (वय २८,रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, कोतवाली), समीर संजय शेख (वय १९, रा. शास्त्रीनगर, शिवमंदिराजवळ भांडेवाडी), फैजान अन्वर शेख (वय १९), माफिया जब्बार शेख आणि मोनी पतिराम कालखोर (वय २२, रा. तिघेही गंगाजमुना वस्तीजवळ), अशी आरोपींची नावे आहेत. तर, गंगाजमुनातील एक वारांगना आणि तिचा प्रियकर (हद्दपार कुख्यात गुंड सनी) हे या धाडसी घरफोडीचे सूत्रधार आहेत.गंगाजमुनातील रहिवासी प्रिया गणेश पाटील (वय २९) हिची आजी कलाबाई कालखोर हिचा मृत्यू झाला. त्यामुळे आजीच्या अंत्यसंस्कार आणि पुढच्या कार्यक्रमासाठी प्रिया तिच्या परिवारातील सदस्यांसह १७ डिसेंबर २०१८ ला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जवळच्या बदनापूर, मोतीझिलला गेली होती. २२ डिसेंबरला ती परत आली तेव्हा तिला घराच्या दाराचे कुलूप तुटून दिसले. चोरट्यांनी घरातील २८९ ग्राम सोन्याचे दागिने तसेच सात लाखांची रोकड असा एकूण १२ लाख ७८ हजारांचा ऐवज लंपास केला होता. प्रिया पाटीलने या धाडसी घरफोडीची तक्रार लकडगंज ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बहुचर्चित गंगाजमुना परिसरात बाहेरचे गुन्हेगार चोरी-घरफोडी करू शकत नाहीत, असा पोलिसांना विश्वास होता. त्यामुळे या घरफोडीत याच वस्तीतील गुन्हेगार सहभागी असावेत, असा पोलिसांनी कयास बांधला. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. काही दिवसांपूर्वी या भागातील एका वारांगनेजवळ चोरीला गेलेल्या दागिन्यातील ब्रेसलेट असल्याची माहिती पोलिसांना कळाली. त्यावरून पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, वारांगनेने हे ब्रेसलेट तिचा प्रियकर कुख्यात तडीपार गुंड सनी वर्माने दिल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी सनीला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत, या गुन्ह्यात सहभागी असलेले समीर शेख, फैजान शेख, माफिया शेख तसेच मोनी कालखोर यांची नावे सांगितली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी या सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८ लाख ८५ हजारांचा ऐवज जप्त केला.मुंबई, गोव्यात मौजमजाप्रिया पाटीलच्या घरी तब्बल सात लाखांची रोकड आणि २८९ ग्राम सोने मिळाल्याने आरोपी सनी त्याच्या प्रेयसी आणि साथीदारांसह थेट मुंबईत गेला. तेथे मौजमजा केल्यानंतर त्यांनी गोव्यातही धमाल केली. परत आल्यानंतर सनीने प्रेयसीला दिलेले चोरीतील ब्रेसलेट घालून ती इकडेतिकडे मिरवत होती. हे ब्रेसलेटच या धाडसी घरफोडीचा भंडाफोड करणारे ठरले. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष खांडेकर, उपनिरीक्षक पी. जी. गाडेकर, एएसआय रवी राठोड, हवालदार प्रकाश सिडाम, दीपक कारोकर, अजय बैस, लक्ष्मीकांत गावंडे, नायक राम यादव, वासुदेव जयपूरकर, फिरोज खान, भूषण झाडे आणि शिवराज पाटील यांनी ही कामगिरी बजावली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी