शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

तुली पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनींचे शोषण

By admin | Updated: January 6, 2017 22:08 IST

कोराडीजवळच्या तुली पब्लिक स्कूलमधील गरीब आदिवासी विद्यार्थिनींसोबत लज्जास्पद चाळे करून तेथील एक कर्मचारी (आचारी) त्यांचे शोषण करीत होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 6 - कोराडीजवळच्या तुली पब्लिक स्कूलमधील गरीब आदिवासी विद्यार्थिनींसोबत लज्जास्पद चाळे करून तेथील एक कर्मचारी (आचारी) त्यांचे शोषण करीत होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जमीर बापत्ती शहा (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. कोराडी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत निरीक्षणासाठी भेट दिल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणात लपवाछपवीची भूमिका स्वीकारल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. कोराडी (नाका) बोखारा परिसरात ही शाळा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या काही गरीब आदिवासी मुली वसतिगृहात राहतात. तेथे स्वयंपाकी (आचारी) म्हणून कार्यरत असलेला जमीर नामक नराधम शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत लज्जास्पद कृत्य करीत होता. त्याच्याविरुद्ध बोलण्याची सोय नसल्यामुळे आणि तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे मुली तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा, तसा आरोपी जमीरकडून होणारा त्रास सहन करीत होत्या. बुधवारी दुपारी शिक्षणाधिकाऱ्याचे एक पथक शाळेच्या निरीक्षणासाठी गेले. तेथे काही मुलींनी त्यांच्याकडे कैफियत मांडली. या प्रकारामुळे हादरलेल्या शिक्षणाधिकारी आणि त्यांच्या पथकाने तुली स्कूलच्या प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणात आरोपी जमीरलला काढून टाकल्याचे सांगितले. पोलिसांकडे तक्रार का केली नाही, या प्रश्नावर शाळा प्रशासनाने चुप्पी साधल्याचे समजते. दरम्यान, पाच ते सात मुलींनी तोंडी आणि लेखी तक्रार केली. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शिक्षणाधिकाऱ्यांतर्फे डी. एस. पगाडे यांनी कोराडी ठाण्यात गुरुवारी सायंकाळी तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचे कलम ३५४(अ) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण सहकलम ७, ८, ११, १२ अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंंदविला. आरोपी जमीर पानखेडा (ता. मंगरूळ, जि. वाशिम) येथील रहिवासी असून, तो गेल्या काही दिवसांपासून शाळेतच राहात होता. पोलिसांनी त्याला गुरुवारी दुपारी अटक केली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांचा तपास दडपणात?या प्रकरणाचा तपास करणारे कोराडी पोलीस दडपणात असल्याचा संशय निर्माण झाला आहे. कोराडीचे ठाणेदार कदम सध्या सुटीवर आहेत. त्यांचा पदभार पी. आय. वड्याळकर हे सांभाळत आहेत. या प्रकरणात महिला पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे यांनी गुन्हा दाखल केला. वड्याळकर यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची माहिती देण्यासाठी बरेच आढेवेढे घेतले. पीडित विद्यार्थिनी आदिवासी समाजाच्या आहेत. त्यामुळे आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. या गंभीर प्रकरणात मात्र तसे झाले नाही. यामागचे कारण काय, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ह्यहळू हळू सर्व करूह्य, असे ते म्हणाले. किती महिन्यांपासून हा संतापजनक प्रकार सुरू होता, त्याचीही माहिती देण्याचे त्यांनी टाळले, एवढेच नव्हे तर आरोपीची पोलीस कोठडी मिळाली काय, अशी विचारणा केलीी असता अद्याप ते कळले नसल्याचे त्यांनी सांगितले. माहिती देण्यासाठी एवढे आढेवेढे का घेतले जात आहे, अशी विचारणा केली असता प्रकरण गंभीर असल्यामुळे माहिती देणे योग्य होणार नसल्याचे वड्याळकर म्हणाले.