लग्नाची वरात महागात पडली, ५० हजार रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 00:30 IST2021-05-07T00:28:28+5:302021-05-07T00:30:27+5:30
Expensive wedding महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी २६ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लाख ५० हजाराचा दंड वसूल केला. पथकाने ५२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. लालगंज भागातील सुदर्शननगर येथील रहिवासी हरबन सिंग समुंद्रे यांच्याकडे असलेल्या लग्नाची वरात काढणे त्यांना महागात पडली.

लग्नाची वरात महागात पडली, ५० हजार रुपये दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी २६ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लाख ५० हजाराचा दंड वसूल केला. पथकाने ५२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. लालगंज भागातील सुदर्शननगर येथील रहिवासी हरबन सिंग समुंद्रे यांच्याकडे असलेल्या लग्नाची वरात काढणे त्यांना महागात पडली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर न करता १०० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ सुरू असल्याने पथकाने ५० हजार रुपये दंड वसूल केला.
तसेच कोविड-१९ च्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंगळवारी झोनअंतर्गत एकूण दोन दुकाने सील करण्यात आली. यामध्ये प्रकाश डेअरी बाबा फरीदनगर, झिंगाबाई टाकळी व सुपर डायमंड सलून सारडा चौक, अनंतनगर या दुकानाचा समावेश आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कारवाई करण्यात आली.