शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
4
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
5
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
6
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
7
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
8
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
9
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
10
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
11
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
13
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
14
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
15
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
16
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
17
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
18
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
19
Mumbai Murder: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
20
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
Daily Top 2Weekly Top 5

एक्झिट पोलने वाढविला बीपी

By admin | Updated: May 13, 2014 00:52 IST

लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले आणि सायंकाळी एक्झिट पोलचा वर्षाव सुरू झाला. या वर्षावात कमळ फुलणार व केंद्रात एनडीएचे सरकार येणार असल्याचे भाकीत केले.

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले आणि सायंकाळी एक्झिट पोलचा वर्षाव सुरू झाला. या वर्षावात कमळ फुलणार व केंद्रात एनडीएचे सरकार येणार असल्याचे भाकीत केले. यामुळे नागपूरच्या राजकीय वतरुळातही नेत्यांचा बीपी वाढला. भाजपचे राष्ट्रीय नेते गडकरी यांच्यासह शिवसेनेचे कृपाल तुमाने आजच जिंकले, असा दावा युतीचे नेते करीत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसजनांना अजूनही खा. विलास मुत्तेमवार व खा. मुकुल वासनिक विजयी होतील, अशी आशा आहे.

निकालासाठी तीन दिवस शिल्लक राहिले असताना पुन्हा एकदा नागपुरात कोण जिंकणार, याबाबतच्या चर्चांना जोर चढला आहे. टीम भाजप उत्साहात आहे. गडकरी पाच नव्हे तर पन्नास हजारांहून अधिक मतांनी जिंकतील, असा दावा करीत आहे. दुसरीकडेही काँग्रेसचे बहुतांश नेतेही विलास मुत्तेमवार जिंकतीलच असे ठामपणे सांगताना दिसत नाही. मात्र, मुत्तेमवारांसाठी मैदानात झटणारी टीम पाचव्यांदा विलासभाऊच दिल्ली गाठतील, असा दावा करीत आहे. रामटेकमध्येही अशीच काहीशी चर्चा आहे. शिवसेनेचे कृपाल तुमाने हे मोठय़ा फरकाने जिंकतील, अशाच चर्चा लग्नसोहळे, साक्षगंध आदी कार्यक्रमांमध्ये रंगताना दिसत आहेत. काँग्रेस कार्यकर्तेही या चर्चांना फारसा विरोध करताना दिसत नाही. निकाल लागू द्या, वासनिकच जिंकलेले दिसतील, असा शेवटचा सूर आवळून ते चर्चेला विराम देत आहेत.

भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे म्हणाले, मतदानाची टक्केवारी १५ टक्क्यांनी वाढली आहे. भाजपने शहरात संघटनात्मक काम केले. गडकरींनी गेली ३५ वर्षे नागपूरकरांची सेवा केली. त्यामुळे मतदारांनी त्यांना भरभरून साथ दिली आहे. ते एक लाखावर मतांनी निवडून येतील, यात शंका नाही. केंद्रात २७२ चे स्वप्न साकार होताना दिसत आहे. गडकरींना दिल्लीत पाठवून नागपूरकरही यात आपला वाटा देणार आहेत, असेही खोपडे म्हणाले. दुसरीकडे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. विरोधी लाटेत इंदिरा गांधी हरल्या तेव्हा नागपुरातून गेव्ह आवारी निवडून आले होते. सर्व समाजाने काँग्रेसला चांगले मतदान केले आहे. भाजपने वर्षभरापूर्वी प्रचार सुरू केला होता. पण शेवटी काँग्रेसने धडाका लावला व भाजपचा जोर कमी झाला. सोनिया गांधी यांनी चिखलीच्या सभेत दिलेला ‘वारे पंजा’चा नारा नागपुरात खरा ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)