नगराळे यांच्यासह चार पीआयच्या बदलीने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 22:53 IST2021-04-28T22:50:14+5:302021-04-28T22:53:52+5:30
पाचपावलीचे किशोर नगराळे यांच्यासह चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे शहरातील ठाणेदारांमध्ये खळबळ माजली आहे. या आठवड्यात तीन हत्या झाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी बुधवारी किशोर नगराळे यांची तत्काळ प्रभावाने आर्थिक शाखेत बदली केली.

नगराळे यांच्यासह चार पीआयच्या बदलीने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावलीचे किशोर नगराळे यांच्यासह चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे शहरातील ठाणेदारांमध्ये खळबळ माजली आहे. या आठवड्यात तीन हत्या झाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी बुधवारी किशोर नगराळे यांची तत्काळ प्रभावाने आर्थिक शाखेत बदली केली. त्यांच्या जागी नवी कामठीचे संजय मेंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सकाळीच नगराळे यांच्या बदलीची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यांच्या जागी नियुक्ती मिळविण्यासाठी दोन-तीन पोलीस निरीक्षकांनी तयारी चालविली होती. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर प्रशासक असलेले मेंढे यांची नियुक्ती केली. मेंढे यांच्या जागी जुनी कामठीचे विजय मालचे यांना पाठविण्यात आले; तर अंबाझरीचे दुय्यम निरीक्षक राहुल शिरे यांना जुनी कामठीचे ठाणेदार नेमण्यात आले. यापूर्वी पोलीस आयुक्तांनी १० एप्रिल रोजी वाठोड्याच्या ठाणेदारांची बदली केली होती.