अखेर झाड कापले, कटही बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:29+5:302021-04-07T04:08:29+5:30

नागपूर : सदर फ्लायओव्हरच्या मॉयल गेटसमोरील कट बंद करण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारे या गेटसमोरील ...

Eventually the tree is cut down, the cut will also close | अखेर झाड कापले, कटही बंद करणार

अखेर झाड कापले, कटही बंद करणार

नागपूर : सदर फ्लायओव्हरच्या मॉयल गेटसमोरील कट बंद करण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारे या गेटसमोरील झाड सोमवारी कापण्यात आले. लवकरच हा कटही बंद केला जाणार आहे. या समस्येची दखल घेऊन ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन ही हालचाल सुरू झाली आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अभिजित जिचकार स्वत: उपस्थित राहून हे काम करून घेत आहेत. या कामाच्या पूर्णत्वासाठी आणि झाड कापण्याच्या परवानगीसाठी संसद सदस्य सडक सुरक्षा समितीचे सदस्य चंद्रशेखर मोहिते यांनी बरेच प्रयत्न केले होते. त्यांचेदेखील या कामावर लक्ष आहे. जिचकार म्हणाले, फ्लायओव्हरच्या डिझाईनमध्ये पूर्वी कट नव्हता. मात्र साईड लेनमध्ये झाड असल्याने हा कट बंद करण्यात आला नव्हता. आता झाड कापण्याची परवानगी मिळाल्याने अडथळा दूर झाला आहे.

Web Title: Eventually the tree is cut down, the cut will also close