शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

सेवानिवृत्तीनंतरही पदाचा मोह सुटेना : कक्षापुढील नावाची पाटीही काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 12:38 AM

जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद ठाकरे यांच्याबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे. ते ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. पण ते अजूनही आपल्याच पदावर कायम आहेत आणि शासनाकडून मिळणाऱ्या सर्व गोष्टींचा उपभोग घेत आहेत. पण त्यांच्या वर्तनामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच अवाक् झाले आहेत.

ठळक मुद्दे शासनाकडून कुठलेही पत्र नसताना सांभाळताहेत जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद ठाकरे यांच्याबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे. ते ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. पण ते अजूनही आपल्याच पदावर कायम आहेत आणि शासनाकडून मिळणाऱ्या सर्व गोष्टींचा उपभोग घेत आहेत. पण त्यांच्या वर्तनामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच अवाक् झाले आहेत.पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी नुकतीच पशुसंवर्धन विभागाची एक बैठक घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत डॉ. ठाकरे हे आठ दिवसात पुन्हा आपल्या पदावर कायम राहतील, अशी घोषणा केली होती. मंत्र्यांच्या या घोषणेमुळे ते स्वत:ला अजूनही पशुसंवर्धन अधिकारीच समजताहेत. मुळात ३१ जुलै रोजी ते सेवानिवृत्त झाले. नियमानुसार त्यांनी आपल्या पदाची जबाबदारी संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यांना सोपविणे गरजेचे होते. पुनर्नियुक्तीचे पत्र येण्याची वाट बघायला हवी होती. मात्र शासकीय नियमांकडे दुर्लक्ष करून विभागाची जबाबदारी पार पाडत आहेत.पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही कायम असल्याबद्दल सर्वच विभाग प्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. पण कुणीही त्यांना हा प्रकार नियमबाह्य असल्याचे सांगायला तयार नाही अथवा त्यांच्यावर कारवाई करायलाही तयार नाहीत. स्थायी समितीच्या बैठकीत एका सदस्याने हा विषय अधिकाऱ्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या लक्षातही आणून दिला. पण कुणीही अ‍ॅक्शन घेतली नाही. मंत्र्यांनीच घोषणा केल्यामुळे अधिकारीही कारवाईचा बडगा उभारण्यास धजावत आहेत. पण प्रशासनात एवढी वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर, प्रशासनाचे नियम अधिकाऱ्यांनीच अंगीकृत करून, सेवानिवृत्तीनंतर तरी पदाचा मोह धरून ठेवणे योग्य नाही.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर