शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात संस्कृत अकादमी स्थापणार

By admin | Updated: January 3, 2016 03:35 IST

संस्कृत ही ज्ञान भाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, ....

मुख्यमंत्र्यांची घोषणा : शालेय शिक्षणात संस्कृत समावेशासाठी लवकरच धोरणनागपूर : संस्कृत ही ज्ञान भाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लवकरच संस्कृत अकादमी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक भवनात आयोजित संस्कृत भारती विदर्भ प्रांत कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते जयराम व्यंकटेश पल्लेवार यांनी लिहिलेल्या भारतरत्नमंजरी या संस्कृत काव्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू उमा वैद्य, संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कामत, प्रचार व प्रसार प्रमुख श्री.श.देवपुजारी, प्रांत मंत्री संजय लाभे, महानगर अध्यक्ष मधुसूदन पेन्ना व विजय पल्लेवार आदी उपस्थित होते. राज्यातील सर्व विभागात संस्कृत भाषेचे बीएड महाविद्यालय सुरू करण्यात येईल. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या विस्तारासाठी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.शालेय शिक्षणात संकृत भाषेचा समावेश कसा करता येईल, यासाठी शिक्षणमंत्र्यासोबत चर्चा करून धोरण निश्चित करण्यात येईल. संस्कृतमध्ये अनेक विषयाचे ज्ञान दडलेले आहे. परंतु ही भाषा आत्मसात न केल्याने अनेक विषयांच्या ज्ञानापासून आपण वंचित राहिलो. ही भाषा विद्वानापुरती मर्यादित राहिल्याने त्याचा प्रचार व प्रसार झाला नाही. इंग्रज राजवटीत संस्कृत भाषेच्या ज्ञानापासून वंचित ठेवण्याचे जाणीवपूर्वक शिक्षण पद्धतीत बदल करून संस्कृत भाषेला दूर ठेवण्यात आले.पल्लेवार लिखित भारतरत्नमंजरी या काव्यपुस्तिकेतील सुंदर रचना इंग्रजी व हिंदीत आहे. यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचण्यात आलेली सुंदर रचना वाचून यापेक्षा दुसरे पुष्प त्यांना कोणीच वाहिलेले नसेल. एवढे वास्तव वर्णन यात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. इंग्रज येण्यापूर्वी भारतात संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी १२५०० विद्यालये तर ७४२ महाविद्यालये होती. यात १ लाख ८० हजार विद्यार्थी शिक्षण घेत होेते. अशी माहिती त्यांनी दिली.भाषांना राजाश्रय व लोकांश्रय प्राप्त झाला तरच त्या टिकून राहतात. संस्कृत भाषा टिकवून ठेवण्यासाठी व त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संस्कृत भारतीकडून होत असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहे. संस्कृत विद्यापीठ या भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उषा वैद्य म्हणाल्या. संस्कृत केवळ प्राचीन गं्रथात अडकून न राहता नव्या योजना आखून त्यावर संशोधन होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाला पल्लेवार कुटुंबीयाकडून १ लाखाचा निधी देण्यात आला आहे. विद्यापीठ कक्षाला पल्लेवार यांचे नाव देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्ताविक श्री.श.देवपुजारी यांनी संस्कृत भाषा राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात सहाव्या वर्षापासून अनिवार्य करण्यात यावी. संस्कृतच्या पाठ्यक्रमाची पुनर्रचना, व गुरुकुलांना शासनाने अनुदान देण्याची मागणी प्रास्ताविकातून केली. संस्कृत भाषेच्या शलाका परीक्षेत व्दितीय आल्याबद्धल सार्थक घोरपडे या विद्यार्थ्यासह लीना रस्तोगी, चंद्रगुप्त कर्णेकर, संपदा म्हाळगी व आभा भिमनवार आदंीना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौररव करण्यात आला. संचालन पौर्णिमा बाराहाते यांनी तर आभार छाया भास्करराव यांनी मानले. रजनी दुद्दलवार व उषा गेडाम यांचीही भाषणे झाली. मधुसूदन पेन्ना यांनी पल्लेवार यांच्या काव्यपुस्तिकेचे विवेचन केले. (प्रतिनिधी)