शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

नागपूर महानगरपालिकेच्या सीमेबाहेर उद्योजकांनी कारखाने सुरू करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 12:19 AM

उद्योग संचालनालयाचे महाव्यवस्थापक जी.ओ. भारती यांनी नागपूर महानगरपालिकेच्या सीमेबाहेर ग्रामीण भागात उद्योग सुरू करण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार परवानगी घेऊन उद्योजकांनी कारखाने सुरू करावेत, असे आवाहन विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष सुरेश राठी यांनी केले आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उद्योग संचालनालयाचे महाव्यवस्थापक जी.ओ. भारती यांनी नागपूर महानगरपालिकेच्या सीमेबाहेर ग्रामीण भागात उद्योग सुरू करण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार परवानगी घेऊन उद्योजकांनी कारखाने सुरू करावेत, असे आवाहन विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष सुरेश राठी यांनी केले आहे.उद्योग संचालनालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पूर्वीच्या एमआयडीसी पोर्टलवर उद्योजकांना आॅनलाईन माहिती द्यायची आहे. ज्या युनिट्सने आधीपासून परवानगी घेतली आहे त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी यापूर्वी अर्ज केले आहेत परंतु ज्यांना परवानगी मिळाली नाही त्यांनी बदललेल्या मोबाईल नंबरसह पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर माहिती त्वरित डाऊनलोड करता येईल.पदयात्रा, सायकल, दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचे पास आणि कामगार, कर्मचारी व ग्रामीण भागातील रहिवासी, पोर्टलवर सुधारित भाग-ब चे नाव, पदनाम, वय, मोबाईल क्रमांक वाहनांच्या प्रकारासह माहिती सादर करायची आहे. वाहन क्रमांक, ज्यांनी आधीपासून परवानगी घेतली आहे, अशासह सर्व उद्योगांचे निवासी पत्ता द्यायचा आहे. युनिट पूर्ण सामर्थ्याने ऑपरेट करायचे आहेत. सर्व कर्मचाऱ्यांसाठी व कर्मचाऱ्यांच्या हालचालीसाठी आणि त्यांच्या ग्रामीण भागातील वाहने केवळ भाग बी फॉर्म भरून एमआयडीसी पोर्टलवरुन मिळविता येतील. महानगरपालिका आयुक्त किंवा स्थानिक पोलीस ठाण्याच्या कार्यालयाकडून कोणतेही पास मिळणार नाही. पूर्वी मिळविलेले पास असे नवीन पास होईपर्यंत वापरले जाऊ शकतात.राठी म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एमएचएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एसओपीचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. नागपूर शहर ते हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वर व इतर कोणत्याही औद्योगिक क्षेत्राकडे जाण्यासाठी सर्व कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी व इतर वाहनांसाठी मनपा आयुक्त कार्यालय, नागपूर येथून पास मिळवावा लागेल. व्हीआयए आणि जिल्हाधिकारी कार्यालय, डीआयसी, एमआयडीसी, महानगरपालिका यासारख्या सर्व प्रशासकीय संस्थांच्या प्रयत्नांनी बहुतांश निर्यात देणारी युनिट्स सुरू झाली आहेत. याशिवाय विस्तृत माहिती व्हीआयए कार्यालयात मिळणार आहे, अशी माहिती व्हीआयएचे सचिव गौरव सारडा, सहसचिव पंकज बक्षी, एक्झिम फोरमचे प्रतीक तापडिया यांनी दिली आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीnagpurनागपूर