शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकाला २८ लाखांनी गंडविले

By admin | Updated: April 20, 2016 03:17 IST

स्थानिक लालाओळीतील उद्योजकाला दलालाने २८ लाख ६६ हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

कामठीत गुन्हा दाखल : आरोपी दलालाचा शोध सुरूकामठी : स्थानिक लालाओळीतील उद्योजकाला दलालाने २८ लाख ६६ हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी गुन्हा दाखल करून, आरोपी दलालाचा शोध घेणे सुरू केले आहे. सुनील शंकरलाल अग्रवाल (५३, रा. लालाओळ, कामठी) यांची कामठीत मोहनलाल शंकरलाल नामक फर्म व चक्रधर राईस मिल आहे. ते विदर्भातील विविध शहरांमध्ये या फर्मच्या माध्यमातून धान्य पुरवठा करतात. पंकज मोदी (४०, रा. गणेशनगर, गोंदिया) हे धान्याचे मोठे दलाल आहेत. मोदी हे अग्रवाल यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी करायचे व तो तांदूळ गोंदियाआणि इतर बाजारपेठेत विकायचे. मागील काही वर्षांपासून त्यांचा व्यवहार सुरळीत सुरू होता. दरम्यान, मोदी यांनी अग्रवाल यांच्याकडून ९ जून २०१२ रोजी ६ लाख ६५ हजार १६७ रुपये किमतीचा ८६४ बॅग तांदूळ खरेदी केला. त्यानंतर १४ सप्टेंबर २०१२ ला ४ लाख ६५ हजार ४१९ रुपये किमतीचा ८९५ बॅग, २४ डिसेंबर २०१२ ला २ लाख १२ हजार ८१६ रुपये किमतीचा ८५० बॅग, १० एप्रिलला ५ लाख ४२ हजार ९३१ रुपये किमतीचा ७२९ बॅग, ३१ जानेवारी २०१३ ला २ लाख २५ हजार ६४ रुपये किमतीचा ३४५ बॅग, १ एप्रिल २०१३ ला ४ लाख १७ हजार ३३५ रुपये किमतीचा ५८८ बॅग तसेच त्याच दिवशी ४ लाख ३७ हजार ५४४ रुपये किमतीचा ६१५ बँग तांदळाची खरेदी केली. या काळात मोदी यांनी अग्रवाल यांच्याकडून एकूण २८ लाख ६६ हजार २७६ रुपये किमतीच्या तांदळाची खरेदी केली. दरम्यान, अग्रवाल यांनी मोदी यांच्याकडे वारंवार या रकमेची मागणी केली. कोणतीही कारणे सांगून मोदी यांनी रक्कम देण्याचे टाळले. शेवटी अग्रवाल यांनी गोंदिया येथे जाऊन मोदी यांच्याकडे रकमेबाबत चौकशी केली. तेव्हा सदर तांदळाच्या बॅग आपल्यापर्यंत पोहोचल्या नसल्याचे मोदी यांनी अग्रवाल यांना सांगितले व सदर रक्कम देण्यास नकार दिला. या व्यवहारात फसगत झाल्याचे लक्षात येताच सुनील अग्रवाल यांनी नवीन कामठी पोलीस ठाण्यात पंकज मोदी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी कामठी पोलिसांनी भादंवि ४२०, ४०९, ४०६ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष चचेरे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)