शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या कर्ज कपातीचा घोळ संपवा

By admin | Updated: February 18, 2015 02:42 IST

जिल्हा परिषद व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वादात शिक्षकांच्या ओडी कर्ज कपातीचा घोळ सुरू आहे. तो संपविण्यात यावा, अशी मागणी ...

नागपूर : जिल्हा परिषद व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वादात शिक्षकांच्या ओडी कर्ज कपातीचा घोळ सुरू आहे. तो संपविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार जिल्हा बँकेच्या सर्व ठेवी व खात्यावरील व्यवहार बंद आहेत. या बँके त जि.प.च्या १४६ कोटींच्या ठेवी आहेत. त्या परत मिळाव्यात यावरून वाद सुरू आहे. बँकेतील ठेवी वसूल करण्याच्या हेतुने जि.प. प्रशासनाने शिक्षकांच्या वेतनातून कपात केलेली ओडी कर्जाची कपात याच खात्यावरील धनादेशाद्वारे वळती केली जात आहे. परंतु या खात्यावरील व्यवहार बंद असल्याने ही रक्कम शिक्षकांच्या कर्ज कपातीत जमा होत नाही. त्यामुळे त्यांचेवर व्याजाचा अतिरिक्त बोजा पडत आहे. ३००० हजार शिक्षक व ३७७३ जि.प.कर्मचारी ओडी धारक आहेत. या संदर्भात जि.प. व बँक अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी चर्चा करूनही अद्याप तोडगा निघालेला नसल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांनी निदर्शनास आणले. या संदर्भात विभागीय आयुक्तांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे निर्देश बावनकुळे यांनी जि.प.प्रशासनाला दिले. शिष्टमंडळात ठाकरे यांच्यासह सुरेश पाबळे, रामू गोतमारे, दिनकर उरकांदे, विलास काळमेघ, राजेश बीरे, रमेश कर्णेवार, सतीश देवतळे, अनिल श्रीगिरीवार, धनराज बोंडे, अनिल नागपुरे, प्रकाश सव्वालाखे, धनंजय चन्ने, अशोक डोंगरे, नारायण चाफले आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)