शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बोअरवेलपेक्षा 'फ्लशिंग'वर देणार भर; ३७ कोटींचा आराखडा तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:22 IST

Nagpur : पाणी-टंचाईग्रस्त गावांसाठी हजारांहून अधिक उपाययोजनाः जिल्हा परिषद प्रशासन झाले सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च महिन्यातच पारा चढला आहे. त्यात पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने आराखडा तयार केला आहे. यंदा नवीन बोअरवेलपेक्षा 'फ्लशिंग'वर भर देण्यात आला आहे. उपयायोजनेसाठी ३७ कोटी ४९ लाख रुपयांच्या खर्चाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. 

आराखड्यात ४०० हून अधिक गावांत १ हजार ४६ उपाययोजना केल्या जाणार आहेत. यावर्षी नवीन बोअरवेल न घेता जुन्या बोअरवेलच्या फ्लशिंगवर पाणीपुरवठा विभागाचा अधिक भर राहणार आहे. तसेच यामध्ये नळयोजना विशेष दुरुस्ती, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, टँकर, खासगी विहीर अधिग्रहण, गाळ काढणे, विहिरींचे खोलीकरण आदी उपाययोजनांची कामे होणार आहेत. 

पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जिल्ह्यात एकाही गावात पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेले नाही. परंतु गेल्यापावसाळ्यात काही भागात पुरेसा पाऊस झाला नसल्याने टँकरची गरज भासू शकते. मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ११ टँकरने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. यात प्रामुख्याने हिंगणा तालुक्यांतील गावांचा समावेश होता.

'फ्लशिंग'च्या ८७५ कामांना मंजुरीटंचाई आराखड्याअंतर्गत ८७५ विंधन विहिरींच्या 'फ्लशिंग' कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक १७१ विंधन विहिरीची कामे केली जाणार आहे. मागणीनुसार टैंकर व गरजेनुसार विहीर अधिग्रहण करणार असल्याची माहिती जि. प.च्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उमल चांदेकर यांनी दिली.

बोअरवेल पुनरुज्जीवित करण्यावर भरबोअरवेल पुनरुज्जीवित करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा मर्यादित राहतो व नव्याने बोअरवेल करण्याची गरजही भासत नाही. सोबतच बोअरवेलवर होणारा अतिरिक्त खर्च टाळता येतो.

टॅग्स :nagpurनागपूर