शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

मातृत्वाचे स्वागत करताना आहाराइतकीच भावनिक आंदोलनेही महत्त्वाची मानली जावी - डॉ. प्रभा चंद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 7:52 PM

गरोदर स्त्रीच्या मनोआरोग्याचेही महत्त्व जाणण्याची गरज बंगळुरु येथील निम्हान्समधील (नॅशनल इन्स्टीट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अ‍ॅन्ड न्यूरो सायन्सेस) आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रभा चंद्रा यांनी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्देअन्य देशांमध्ये आहार व मानसिक आरोग्याचा साकल्याने होतो विचारआपण प्रत्युत्तरवादी झालो आहोत

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गरोदर स्त्रीच्या आहाराबाबत आपला देश थोडाफार सजग झाला असला तरी तिच्या मानसिक आरोग्याबाबत मात्र आपण इतर देशांच्या तुलनेत अजूनही फार मागे आहोत असे प्रतिपादन करतानाच तिच्या मनोआरोग्याचेही महत्त्व जाणण्याची गरज बंगळुरु येथील निम्हान्समधील (नॅशनल इन्स्टीट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अ‍ॅन्ड न्यूरो सायन्सेस) आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रभा चंद्रा यांनी येथे व्यक्त केली. नागपुरात भारतीय स्त्री शक्तीच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी त्या येथे आल्या होत्या.गरोदर स्त्रिया जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांना, तुम्ही इथे कशा पोहचलात असा प्रश्न विचारतो. त्यावरची त्यांची उत्तरे फार अंतर्मुख करणारी असतात. आजही आपल्या देशात स्त्रियांना प्रेग्नन्सी ही नियोजनपूर्वकरित्या आखता येत नाही. ती त्यांच्यावर लादली जाते किंवा ती अपघाताने त्यांच्या आयुष्यात येते. त्या मानसिकदृष्ट्या मातृत्वासाठी तयारच नसतात. अशात प्रेग्नन्सीमुळे होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे होणारी भावनिक आंदोलने सांभाळण्याचे कसब त्यांच्यात तर नसतेच पण त्यांच्या कुटुंबियांनाही त्याचे महत्त्व वाटत नसते.अनेक देशांमध्ये तेथील गरोदर स्त्रियांच्या आहारासोबत त्यांच्या आनंदी राहण्याबाबतही तेथील वैद्यक क्षेत्र व सरकार सजग असते. त्यादृष्टीने तेथे आहार व विहार सुचविला जातो. आपल्याकडे या सगळ््याच बाबीची उणीव आहे.अलीकडची पिढी ही प्रत्युत्तरवादी (रिअ‍ॅक्टिव्ह) झाली आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या हाती सदैव असलेला मोबाईल होय. कुठल्याही स्टेटसला तात्काळ उत्तर देण्याची जी सवय मनाला जडली आहे त्यामुळे आपण आपल्या आत्मप्रतिबिंबापासून फार दूर चाललो आहोत. सगळं काही बाहेरून आपल्यात कोसळत आहे. मात्र आपल्यातलं आतलं पाहणं आपण विसरत चाललो आहोत.कृतज्ञता हा मानवाचा फार मोठा गुण असून तोच आपण विसरत चाललो आहोत. आभार मानणे वा आभारी असणे हे शिकवले जात नाही. कोरड्या थँक्स पुरेसे नाहीत. ते मनापासून जाणवलं पाहिजे. तरंच माणसामाणसातले संबंध अधिक बळकट होतील. जगात सर्वत्र तणावाचे वातावरण वाढते आहे. त्याकरिता सकारात्मक मानसिकता वाढवणे व जपण्याची चळवळ सर्वत्र सुरू व्हायला हवी, अशी गरज त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकास