नागपूर विमानतळावर बांगलादेश विमानाचे इमर्जन्सी लँडिग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 15:30 IST2021-08-27T15:30:11+5:302021-08-27T15:30:49+5:30
Nagpur Airport : बांगलादेश एअरलाईन्सचे हे विमान मस्कतहून ढाक्याला जात होते.

नागपूर विमानतळावर बांगलादेश विमानाचे इमर्जन्सी लँडिग
नागपूर: पायलटला हृदयविकाराचा त्रास झाल्याने बांगलादेशच्या विमानाचे नागपूरविमानतळावर इमर्जन्सी लँडिग करण्यात आले.
बांगलादेश एअरलाईन्सचे हे विमान मस्कतहून ढाक्याला जात होते. विमानाच्या पायलटला हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास विमान तातडीने नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले.
पायलटला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजून यात्री इथेच असून एअरलाईन्सने पर्यायी विमानाची व्यवस्था केल्यानंतर ते रवाना होतील, अशी माहिती संचालक आबीद रूही यांनी दिली.