एल्गार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य तपासून पाहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 11:09 IST2021-02-01T11:08:14+5:302021-02-01T11:09:13+5:30

Nagpur News एल्गार परिषदेत काही आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्या कार्यक्रमाचे व्हिडीओ तपासून आक्षेपार्ह वक्तव्य तपासून पाहिले जात आहे अशी माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी येथे दिली.

Elgar will examine the offensive statement at the conference | एल्गार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य तपासून पाहणार

एल्गार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य तपासून पाहणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: एल्गार परिषदेत काही आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्या कार्यक्रमाचे व्हिडीओ तपासून आक्षेपार्ह वक्तव्य तपासून पाहिले जात आहे अशी माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी येथे दिली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी, देशातील नागरिकांवर असलेला कराचा बोजा कमी व्हावा. पेट्रोलच्या किमती कमी व्हाव्यात. जिएसटी चा परतावा मिळावा असे प्रतिपादन केले.

 

Web Title: Elgar will examine the offensive statement at the conference