शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
8
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
9
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
10
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
11
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
12
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
13
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
14
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
15
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
16
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
17
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
18
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
19
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
20
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती रामटेकात धावला नागपुरात मंदावला

By admin | Updated: May 17, 2014 02:00 IST

बसपाच्या हत्तीच्या चालीवर काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची गणिते ठरत होती. मात्र, या वेळी नागपूर व रामटेक मतदारसंघात भाजप- शिवसेनेने एकतर्फी विजय नोंदविला.

बसपा तिसर्‍या क्रमांकावर : लाखाच्या जवळपास मते

आनंद डेकाटे - नागपूर

बसपाच्या हत्तीच्या चालीवर काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची गणिते ठरत होती. मात्र, या वेळी नागपूर व रामटेक मतदारसंघात भाजप- शिवसेनेने एकतर्फी विजय नोंदविला. त्यामुळे लाखाच्या आसपास मते घेऊनही हत्तीला पाहिजे महत्त्व आले नाही. गेल्यावेळीपेक्षा रामटेकमध्ये हत्ती जोरात धावला. किरण पाटणकर यांना ९५ हजार ५१ मते मिळाली. तर नागपुरात हत्तीची चाल मंदावली. डॉ. मोहन गायकवाड यांना ९६ हजार ४३३ मते मिळाली. जिल्ह्यात बसपाची दोन लाखांची व्होट बँक तयार करण्यात बसपाला या वेळी यश मिळाले. हेच त्यांच्यासाठी या निवडणुकीचे फलित आहे.

बसपाने नागपुरात ८.८८ टक्के तर रामटेकमध्ये ९.0४ टक्के मते घेतली. नागपुरात तर ‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया यांना मागे टाकत तिसर्‍या क्रमांकाचे स्थान निश्‍चित केले. रामटेकमध्येही बसपा तिसर्‍या क्रमांकावर राहिली. त्यामुळे जिल्ह्यात युती, आघाडी नंतर तिसर्‍या पायरीवर आता बसपाचा हत्ती स्थिरावला असल्याचे चित्र आहे. ‘हात’ मिळविला. बसपा स्वतंत्ररित्या लढली. या निवडणुकीत रिपब्लिकन मते बर्‍यापैकी काँग्रेस- रिपाइं सोबत गेल्याने बसपाचा ग्राफ घसरला.

गेल्या काही निवडणुकांचा आढावा घेता नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघात बसपाच्या हत्तीने गती धरल्याचे दिसते. १९९८ चा अपवाद वगळता १९९१ ते २00९ च्या निवडणुकांमध्ये बसपाच्या मतांचा आलेख चढतच गेलेला आहे. बसपाचा हत्ती दिवसेंदिवस धावत असल्याचे चित्र आहे. बसपाचा उमेदवार कोण, यावर दोन्ही मतदारसंघाचे बरेच काही अवलंबून आहे. बसपाने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. येथे नेहमीच वेळेवर व अनपेक्षित उमेदवार देण्याची बसपाची प्रथा राहिली आहे. त्यामुळे या वेळी बसपाच्या हत्तीवर कोण स्वार होतात, याकडे राजकीय वतरुळाचे लक्ष लागले आहे.

बसपाने गेल्या निवडणुकांमध्ये मुसंडी घेतली आहे. १९९१ मध्ये नागपुरात सिद्धार्थ पाटील यांना केवळ १२हजार १२७ तर रामटेकमध्ये प्रा. मा.म. देशमुख यांना १२ हजार ३९३ मते मिळाली होती. त्यावेळच्या अपक्ष अपक्ष उमेदवारांच्या तुलनेत ही मते बर्‍यापैकी होती. पुढील निवडणुकीत बसपा जोर मारेल, असे अंदाज बांधले जात असताना १९९६ मध्ये बसपाची रिपाइंसोबत युती झाली. युतीत नागपूर व रामटेक या दोन्ही जागा रिपाइंसाठी सोडण्यात आल्या. विशेष म्हणजे या निवडणुकीत रिपाइंच्या उमेदवारांनी भरभरून मते घेतली. १९९८ मध्ये बसपा पुन्हा स्वबळावर लढली. या निवडणुकीत बसपाची मते दुप्पट झाली. नागपुरातून सिद्धार्थ पाटील यांना २१ हजार ३६२ मते तर रामटेकमधून राम हेडाऊ यांना ३0 हजार ९४९ मते मिळाली. ११९८ च्या यशाने बसपा नेते फार्मात होते. तर दुसरीकडे बसपाचे वाढलेले प्रस्थ रिपाइं नेत्यांनाही खटकणारे होते. याचा परिणाम १९९९ च्या निवडणुकीत दिसून आला. १९९९ मध्ये बसपा व रिपाइं एकमेकांपासून चार हात दूर राहिले. दुसरीकडे रिपाइंने काँग्रेसशी

१९९८ च्या तुलनेत बसपाला जवळपास निम्मीच मते मिळाली. नागपुरात प्रा. पी.एस. चंगोले यांना १४ हजार ४६५ तर रामटेकमध्ये अशोक इंगळे यांना १६ हजार ७0६ मतांवर समाधान मानावे लागले. बसपासाठी कमी झालेली मते हा एक मोठा धक्का होता. पुढील पाच वर्षे बसपाचे कॅडर कामी लागले. उमेदवारीचे निकषही बदलले गेले. २00४ मध्ये नागपुरातूव जयंत दळवी तर रामटेकमधून प्रा. चंदनसिंग रोटेले रिंगणात उतरले. दोन्ही मतदारसंघात बसपाच्या उमेदवारांनी पहिल्यांदा ५0 हजार मतांचा पल्ला गाठला. दळवी यांना ५७ हजार २७ व रोटेले यांना ५५ हजार ४४२ मते मिळाली.

२00९ च्या निवडणुकीत बसपाने नागपुरात सोशल इंजिनिअररिंगचा प्रयोग केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष व तेली समाजात प्रस्थ असलेले माणिकराव वैद्य यांना उमेदवारी दिली. या वेळी बसपाने पहिल्यांदा १ लाखाचा पल्ला ओलांडला. वैद्य यांना १ लाख १८ हजार ७४१ मते मिळाली व बसपा तिसर्‍या क्रमांकावर पोहचली. रामटेक अनुसूचित जातीसाठी राखीव होते. येथे प्रकाश टेंभूर्णे रिंगणात उतरले. मतदारांना फारसे परिचित नसलेले टेंभूर्णे यांनी चक्क ६२ हजार २३८ मतांवर मजल मारली होती.