शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

नागपुरात फिक्स चार्ज वाढवणार वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:45 AM

महावितरणने मंगळवारी आपल्या पाच वर्षांपर्यंतच्या वीज दरवाढीची तयारी सार्वजनिक केली आहे. यात त्यांनी असा दावा केला आहे की, वर्ष २०२१ मध्ये प्रति युनिट दरांमध्ये सरासरी ५.८० टक्के वाढ होईल.

ठळक मुद्दे२०१७ मध्ये होते ६० रुपये आता १०० रुपये करण्याची विनंतीदरवाढीसह इतर शुल्कावरही होणार परिणाम

लेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणने मंगळवारी आपल्या पाच वर्षांपर्यंतच्या वीज दरवाढीची तयारी सार्वजनिक केली आहे. यात त्यांनी असा दावा केला आहे की, वर्ष २०२१ मध्ये प्रति युनिट दरांमध्ये सरासरी ५.८० टक्के वाढ होईल. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, इतर शुल्कात झालेल्या वाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या हाती येणाऱ्या विजेच्या बिलावर दिसून येईल. उदाहरणार्थ महावितरणने सिंगल फेज कनेक्शनचे फिक्स्ड चार्ज १०० रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. वर्ष २०१७ मध्ये हे शुल्क ६० रुपये इतके होते.महावितरणने राज्य वीज नियमक आयोगासमोर ‘मल्टी इयर टॅरिफ’ याचिका दाखल करीत असा दावा केला आहे की, वीज खरेदी करण्यासाठी त्यांना आता अधिक पैसे मोजावे लागत आहे. वरून पारेषण खर्चही वाढला आहे. आवक-जावकमध्ये संतुलन बनवून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे आता वीज बिलाच्या माध्यमातून ६०,३१३.११ कोटी रुपये वसूल करण्याशिवाय इतर कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. कंपनीने यासाठी वर्ष २०२१-२२ मध्ये ३.२१ टक्के, २०२२-२३ मध्ये २.९३ टक्के, २०२३-२४ मध्ये २.६१ टक्के आणि २०२४-२५ मध्ये २.५४ टक्के दरवृद्धीची मागणी केली आहे. ही वृद्धी कमी दिसून येत असली तरी वीज क्षेत्रातील तज्ज्ञानुसार प्रत्यक्ष वृद्धी यापेक्षा कितीतरी अधिक राहील. फिक्स्ड चार्जमध्ये करण्यात आलेली वृद्धी याचे मुख्य कारण राहील. सिंगल फेजसोबतच थ्री फेज कनेक्शनसाठीही आता फिक्स चार्ज वाढवून ३२० रुपये करण्याची विनंती करण्यात आली आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये हे शुल्क १७० रुपये इतके होते. इतकेच नव्हे तर महावितरणने यावेळी स्मशानभूमी, पथदिवे आणि पाणी पुरवठ्याच्या वीज दरामध्येही वाढ केली आहे.उद्योगांना फटका, व्हीआयएचा आक्षेपविदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष आर.बी. गोयंका यांनी सांगितले की, उद्योगांना या प्रस्तावामुळे मोठा फटका बसेल. नुकसान होईल. केव्हीएच प्रणाली लागू केल्यास विजेचा उपयोग वाढेल, पर्यायाने खर्च वाढेल. वरून डिमांड चार्ज ३९० रुपये प्रति केव्हीए वाढवून ६५० रुपये प्रति केव्हीए केल्याने उद्योगांचे विजेचे बिल वाढेल. व्हीआयए या याचिकेच्या विरोधात आपली आपत्ती नोंदवेल, असेही गोयंका यांनी सांगितले.सोलर रुफ टॉपलाही फटकासोलर रुफ टॉप लावणाऱ्यांसाठी प्रति ए.पी. लोड ग्रीड सहाय्यता शुल्क प्रस्तावित करून महावितरणने त्यांनाही तगडा झटका दिला आहे. आय.बी. गोयंका यांचे म्हणणे आहे की, सोलर लावणाऱ्यांचा प्रति युनिट खर्च ८ रुपयापर्यंत जाईल. सोलर रुफ टॉप संपवण्याचाच हा प्रयत्न असल्याचेही गोयंका यांनी म्हटले आहे.महसुलातील अंतर ३४ टक्के वाढलेमहावितरणने याचिकेत असा दावा केला आहे की, त्यांना ४६,४७६ कोटी रुपयाचा महसूल भरायचा आहे. यासाठी दरवृद्धी केली जात आहे. २०१८ च्या याचिकेत ते ३४,६४६ कोटी इतके होते. हे अंतर आता ३४ टक्के वाढले आहे. तज्ज्ञानुसार महावितरणची कार्यपद्धती यासाठी जबाबदार आहे. कंपनी आपले अपयश लपविण्यासाठी सामान्य नागरिकांवर बोजा टाकत आहे.राज्य सरकारने हस्तक्षेप करावाविजेच्या दरांना नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. ऊर्जा विशेषज्ञ महेंद्र जिचकार यांचे म्हणणे आहे की, राज्य सरकारला या वृद्धीवर रोख लावायला हवी. विदर्भातील उद्योगांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजbillबिल