शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू

By admin | Updated: January 11, 2015 00:44 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून याच प्रक्रियेत शनिवारी नागपूर महानगर संघचालकपदी चार्टर्ड अकाऊन्टंट व नागपूर नागरी सहकारी

लोया नवे महानगर संघचालक : ‘नंबर टू’साठी निवड प्रक्रिया सुरूनागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघात संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून याच प्रक्रियेत शनिवारी नागपूर महानगर संघचालकपदी चार्टर्ड अकाऊन्टंट व नागपूर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश लोया यांची नियुक्ती करण्यात आली. महानगर सहसंघचालक पदावर श्रीधर गाडगे यांची नियुक्ती करण्यात आली. मार्च महिन्यात नागपूरमध्ये होणाऱ्या प्रतिनिधी सभेत संघाचे सरकार्यवाह (नंबर टू) या पदासाठी निवडणूक होईल. शनिवारी सकाळी रेशीमबागस्थित स्मृती भवनात महानगर संघचालक पदासाठी निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गत १६ वर्षापासून या पदावर कार्यरत डॉ. दिलीप गुप्ता यांच्या जागी राजेश लोया यांची निवड झाली. गुप्ता यांनीच लोया यांच्या नावाची शिफारस केली. त्यांतर लोया यांनी सहसंघचालक म्हणून श्रीधर गाडगे यांची नियुक्ती केली. यापूर्वी या पदावर लक्ष्मणराव पार्डीकर काम करीत होते.गाडगे यांच्याकडे संघ कार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. यांनी यापूर्वी विदर्भ प्रांत शारीरिक प्रमुख, बौद्धिक प्रमुख या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या असून प्रांत कार्यवाह म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या त्यांच्याकडे पश्चिम क्षेत्र शारीरिक प्रमुख म्हणून जबाबदारी कायम आहे. दादाराव भडके यांची पुन्हा एकदा प्रांत संघचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. या प्रक्रियेस गत नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात शाखा प्रतिनिधींची निवड करण्यात आली. शहरातील ७ हजार स्वयंसेवकांमधून १५० शाखा प्रतिनिधीं निवडण्यात आले. त्यांनी आज महानगर संघचालक निवड प्रक्रियेत भाग घेतला. याच वेळी प्रतिनिधी सभेसाठी नागपूरच्या तीन स्वयंसेवकांची नावे निश्चित करण्यात आली. त्यात मोहन अग्निहोत्री, उदय वानखेडे, पुरुषोत्तम बोकडे यांचा समावेश आहे. सरकार्यवाहच्या निवडणूक प्रक्रियेत या तिघांना मताधिकार असेल. (प्रतिनिधी)व्यक्तित्व विकासावर भर देणार -लोयामहानगर संघचालक म्हणून काम करताना व्यक्तित्व विकासावर भर देऊ, असे नवनिर्वाचित महानगर संघचालक राजेश लोया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नियोजन करून सोप्या पद्धतीने केल्यास कुठलेही काम कठीण नाही, असे ते म्हणाले. लोया प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटन्ट आहेत. इन्कम टॅक्स बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि हरिव्दार देव संस्कृत विद्यापीठाच्या आर्थिक समितीचे संयोजक आहेत.भय्याजींची फेर निवड निश्चितमहानगर संघचालकांच्या निवड प्रक्रियेनंतर आता सर्वांचे लक्ष मार्च महिन्यात होणाऱ्या प्रतिनिधी सभेकडे लागले आहे. दर तीन वर्षांनी नागपूरमध्ये होणाऱ्या या सभेत सरकार्यवाह (संघातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पद) या पदाची निवडणूक होते. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधीं या निवडणुकीत मतदार असतात. २०१२ मध्ये या पदावर भय्याजी जोशी यांची निवड झाली होती. संघातील सूत्रानुसार यावेळी त्यांची फेरनिवड जवळपास निश्चित मानली जात आहे.