शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी; नाना पटोले यांनी दाखल केली आहे याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 07:35 IST

लोकसभा निवडणुकीनंतर गडकरी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात तीन निवडणूक याचिका दाखल झाल्या होत्या. त्यापैकी नाना पटोले व मतदार मो. नफिस खान यांची याचिका प्रलंबित आहे.

नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी शुक्रवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर ६ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षकारांच्या विनंतीवरून ही तारीख दिली.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी हे नागपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी निवडणुकीच्या नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यांनी उत्पन्न लपवून ठेवले. उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी निवडणूक कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करून नागपूर मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे पटोले यांचे म्हणणे आहे. 

गडकरी यांनी या याचिकेतील अनावश्यक व आधारहीन मुद्दे वगळण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सहाव्या ऑर्डरमधील नियम १६ अंतर्गत आणि ही याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारीज करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ (ए) अंतर्गत अर्ज दाखल केले आहेत. ते अर्जदेखील पुढील सुनावणीत विचारात घेतले जातील. पटोले यांच्यावतीने ॲड. सतीश उके तर, गडकरी यांच्यावतीने ॲड. देवेंद्र चव्हाण यांनी कामकाज पाहिले. न्यायालय काय निर्णय देते याकडे लक्ष लागले आहे.

तीन निवडणूक याचिका दाखललोकसभा निवडणुकीनंतर गडकरी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात तीन निवडणूक याचिका दाखल झाल्या होत्या. त्यापैकी नाना पटोले व मतदार मो. नफिस खान यांची याचिका प्रलंबित आहे. वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दरम्यान, गडकरी यांनी खान यांची याचिका खारीज करण्यासाठी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८६(१) अंतर्गत अर्ज दाखल केला होता. तो अर्ज नामंजूर झाला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाnagpurनागपूरElectionनिवडणूक