वृद्ध महिलेची हत्या

By Admin | Updated: November 18, 2016 03:11 IST2016-11-18T03:11:13+5:302016-11-18T03:11:13+5:30

नातवासोबत राहणाऱ्या वृद्ध महिलेचा बत्त्याने ठेचून खून करण्यात आला.

Elderly woman murdered | वृद्ध महिलेची हत्या

वृद्ध महिलेची हत्या

महादुला येथील घटना : आरोपीचा शोध सुरू
कोराडी : नातवासोबत राहणाऱ्या वृद्ध महिलेचा बत्त्याने ठेचून खून करण्यात आला. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
प्रमिलाबाई मारोतराव कानफाडे (६२, रा. धुळस ले-आऊट, महादुला, ता. कामठी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. पती मारोतराव कानफाडे यांच्या निधनानंतर प्रमिलाबाई या त्यांच्या नातवासोबत राहात होत्या. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी घराचे दार न उघडल्याने शेजारी राहणाऱ्या काही महिलांनी त्यांना आवाज दिला.
आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महिलांना संशय आला आणि त्यांनी ही बाब पुरुष मंडळींना सांगितली. शेजाऱ्यांनी घराचे दार उघडून आत बघितले असता प्रमिलाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे लगेच कोराडी पोलिसांना सूचना देण्यात आली.
माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. प्रमिलाबाईच्या डोक्यावर बत्त्याने तसेच मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याने खोल जखमा असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. या जखमांवरून त्यांची हत्या केली असल्याचे स्पष्ट होते. याला कोराडी पोलिसांनीही दुजोरा दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Elderly woman murdered