नागपुरात वृद्ध डॉक्टरला मारहाण : दोघांना अटक, साथीदार फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 20:43 IST2020-06-26T20:41:43+5:302020-06-26T20:43:15+5:30
मंदिराजवळ असलेल्या प्रेमीयुगुलाला हटकले म्हणून आरोपी तरुण आणि त्याच्या साथीदारांनी एका वृद्ध डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या बचावासाठी आलेल्या अन्य ज्येष्ठ नागरिकांनाही आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी आणि गुरुवारी रात्री ही घटना घडली.

नागपुरात वृद्ध डॉक्टरला मारहाण : दोघांना अटक, साथीदार फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंदिराजवळ असलेल्या प्रेमीयुगुलाला हटकले म्हणून आरोपी तरुण आणि त्याच्या साथीदारांनी एका वृद्ध डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या बचावासाठी आलेल्या अन्य ज्येष्ठ नागरिकांनाही आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी आणि गुरुवारी रात्री ही घटना घडली.
डॉ. ज्ञानेश बापूराव ढाकुलकर (वय ६०) हे सक्करदऱ्यातील दत्तात्रयनगर सर्वेश्वर मंदिराजवळ राहतात. २५ जूनला त्यांना मंदिराजवळ एक प्रेमीयुगुल आढळले. त्यामुळे ढाकुलकर यांनी विचारपूस करून त्यांना हुसकावून लावले. त्याचा राग मनात ठेवून गुरुवारी रात्री ९.४० ला आरोपी निहाल अशोक गणवीर, संकेत अनिल गजभिये, आर्यन रामभाऊ मेश्राम, निखिल अशोक गणवीर, अनिकेत ताजने, हर्ष लोणारे आणि त्यांचा एक साथीदार मंदिराजवळ आले. यावेळी ढाकुलकर आणि अन्य ज्येष्ठ नागरिक मंदिरासमोर बसून गप्पा करत होते. आरोपीने ढाकुलकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. ते पाहून अन्य ज्येष्ठ नागरिक ढाकुलकर यांना वाचविण्यासाठी पुढे आले असता आरोपींनी त्यांनाही अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी जमल्यानंतर आरोपी पळून गेले. या घटनेची तक्रार ढाकुलकर यांनी पोलिस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी लगेच धावपळ करून आरोपी निहाल गणवीर आणि संकेत गजभिये या दोघांना अटक केली. त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.