शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढे संकट कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 11:01 AM

आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे कोरोनामुळे निर्माण झालेले संकट कायमच आहे. या विद्यार्थ्यांसाठी अनलॉक लर्निंगची पद्धत सुचविली असली तरी सद्यपरिस्थिती लक्षात घेता ही पद्धतच ‘फेल’ ठरण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देअनलॉक लर्निंग सुविधांअभावी ‘फेल’ दुर्गम गावांमध्ये कसे पोहचणार शिक्षण?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संक्रमणामुळे शाळा कधी सुरू करायच्या, यावर विचारमंथन सुरू आहे. शहरी शाळांमध्ये ऑनलाईन लर्निंग सुरू झाले आहे. खासगी आणि जिल्हा परिषदांच्या शाळांनीही यात पुढाकार घेतला आहे. मात्र आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे कोरोनामुळे निर्माण झालेले संकट कायमच आहे. या विद्यार्थ्यांसाठी अनलॉक लर्निंगची पद्धत सुचविली असली तरी सद्यपरिस्थिती लक्षात घेता ही पद्धतच ‘फेल’ ठरण्याचा धोका आहे.

दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांचे मोठे योगदान आहे. राज्यातील हजारो विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेतात. एकट्या नागपूर विभागाचा विचार केला तरी या विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये ९२ हजार विद्यार्र्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनलॉक लर्निंग प्रकल्प हाती घेण्याचे ठरले होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन शिकवायचे, ही संकल्पना होती. मात्र पावसाळ्यात अनेक गावांपर्यंत बसेस पोहचत नाही; अशा गावांमध्ये शिक्षकांनी रोज जाऊन शिकविणे कसे शक्य होईल, याचा विचारच यात झालेला नाही. वस्ती, तांडे, पोड, पाड्यावर राहणाऱ्या आदिवासी गावांची लोकसंख्या फारच कमी असते. अशा गावांमध्ये शिकणारे विद्यार्थीही बोटावर मोजण्याइतपत असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनी पोहचायचे कसे, हा अडचणीचा मुद्दा आहे. प्रत्यक्षात आदिवासी शाळांसाठी अनलॉक लर्निंग राबविताना या बाबींचा विचार झाला नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे, गावापर्यंत इंटरनेट सुविधा नसणे, दळणवळणासाठी योग्य रस्ते नसणे या येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील मुख्य अडचणी आहेत. वसतिगृह आणि शाळा कधी सुरू होणार याचा अद्यापही पत्ता नसल्याने आज तरी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.नामांकितचेही शिक्षण सुविधांमुळे अडलेशहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळा प्रवेशाची योजना आहे. राज्यात २५ हजार तर नागपूर विभागात सुमारे १० हजार विद्यार्थी यातून शिक्षण घेतात. या शाळा शहरात असून त्यात शिकणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांकडे इंटरनेट, अँड्रॉईड मोबाईलसारख्या सुविधा आहेत. या शाळांनी आपल्या व्द्यिार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू केले असले तरी आदिवासी भागात राहणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांकडे अशा सुविधा नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम सुरू होऊनही हे विद्यार्थी मात्र अन्य व्द्यिार्थ्यांच्या तुलनेत मागे पडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात सत्र सुरू झाल्यावर या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शाळा भरून काढणार का, हा सुद्धा प्रश्नच आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र