शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी कुलगुरूसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही

By admin | Updated: October 9, 2014 01:05 IST

आकस्मिक परिस्थितीत प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात येणाऱ्या व्यक्तीची केवळ सुयोग्यता तपासली पाहिजे की, त्यासोबत शैक्षणिक पात्रताही आवश्यक आहे हा प्रश्न निकाली निघाला आहे.

हायकोर्टाचा निर्णय : कुलपतींच्या अधिकारांत हस्तक्षेप करण्यासही नकारनागपूर : आकस्मिक परिस्थितीत प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात येणाऱ्या व्यक्तीची केवळ सुयोग्यता तपासली पाहिजे की, त्यासोबत शैक्षणिक पात्रताही आवश्यक आहे हा प्रश्न निकाली निघाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रभारी कुलगुरूसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी आज, बुधवारी हा निर्णय दिला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या व्यक्तीची प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात यावी व कुलपती यांना प्रभारी कुलगुरू नियुक्तीचा अधिकार देणाऱ्या कलमाचा अन्वयार्थ लावण्यात यावा यासाठी सिनेट सदस्य गुरुदास कांबडी यांनी रिट याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील कलम १२ (७) मधील तरतुदी लक्षात घेता न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. डॉ. विलास सपकाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर कुलपतींनी गेल्या ३० मार्चच्या आदेशान्वये विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे कुलगुरूचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. कुलगुरू विद्यापीठाच्या सर्व वैधानिक मंडळे व निवड समितीचे प्रमुख असतात. यामुळे अशा पदांवर शैक्षणिक पात्रता असलेल्या व्यक्तीचीच नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. प्रा. सुनील मिश्रा यांनी या प्रकरणात मध्यस्थी अर्ज केला होता. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर गेल्या तारखेला न्यायालयाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, कुलपतींतर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर, विभागीय आयुक्तांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे, विद्यापीठातर्फे अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील, तर शासनातर्फे सरकारी वकील भारती डांगरे यांनी कामकाज पाहिले. कायद्यातील तरतुदी स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने वरिष्ठ वकील एम. जी. भांगडे यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली होती. न्यायालयाचे निरीक्षणमहाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील कलम १२ (७) मध्ये प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात येणारी व्यक्ती सुयोग्य असण्यासोबतच आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव धारण केलेलीही असली पाहिजे असे कोठेही म्हटलेले नाही. या कलमानुसार प्रभारी कुलगुरूपदी ‘सुयोग्य’ व्यक्तीची नियुक्ती करणे आवश्यक आहे. ‘सुयोग्य’ असलेल्या व्यक्तीकडे कुलगुरूपदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभवही असला पाहिजे एवढ्यावरच या कलमाचा अर्थ मर्यादित ठेवू शकत नाही. ‘सुयोग्य’ निकषापुढे ‘कोणीही’ हा शब्द वापरण्यात आला आहे. हा शब्द शैक्षणिक पात्रतेचे बंधन करीत नाही.(प्रतिनिधी)अधिकाराच्या दुरुपयोगाचा आक्षेप फेटाळलाकुलपती यांना प्रभारी कुलगुरू नियुक्त करण्याचे असाधारण अधिकार देण्यात आले आहेत. याचिकाकर्त्याने या अधिकारावर घेतलेला आक्षेप न्यायालयाने फेटाळून लावला. कुलपती यांच्याकडून अधिकारांचा दुरुपयोग होऊ शकतो, केवळ या आधारावर कायदा चुकीचा असल्याचे ग्राह्य धरू शकत नाही. कुलपतींनी अधिकाराचा दुरुपयोग केल्यास वादग्रस्त निर्णय बदलविला जाऊ शकतो. तक्रारकर्ती व्यक्ती संवैधानिक न्यायालयात कधीही दाद मागू शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.कुणाला शैक्षणिक पात्रता आवश्यकप्रभारी नियुक्ती करताना कोणकोणत्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पाहिजे यासंदर्भातही न्यायालयाने खुलासा केला आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक व कोणत्याही प्राधिकरण किंवा मंडळावरील सदस्य या पदांवर प्रभारी नियुक्ती करताना संबंधित व्यक्तीने त्या-त्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण केलेली असणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.