दोन कोटींचे डस्टबिन गेले चोरीला ! रस्त्यावर साचताहेत कचऱ्याचे ढीग, नागपुरात लावले होते तब्बल १२०० डस्टबिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 20:18 IST2026-02-14T20:17:34+5:302026-02-14T20:18:43+5:30

Nagpur : स्वच्छ व सुंदर शहराचे स्वप्न दाखवत महापालिकेने दोन वर्षापूर्वी मोठ्या थाटात बसवलेले स्टेनलेस स्टीलचे डस्टबिन आता रहस्यमयरीत्या गायब झाले आहेत.

Dustbins worth Rs 2 crore stolen! Piles of garbage are piling up on the roads, 1200 dustbins were installed in Nagpur | दोन कोटींचे डस्टबिन गेले चोरीला ! रस्त्यावर साचताहेत कचऱ्याचे ढीग, नागपुरात लावले होते तब्बल १२०० डस्टबिन

Dustbins worth Rs 2 crore stolen! Piles of garbage are piling up on the roads, 1200 dustbins were installed in Nagpur

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
स्वच्छ व सुंदर शहराचे स्वप्न दाखवत महापालिकेने दोन वर्षापूर्वी मोठ्या थाटात बसवलेले स्टेनलेस स्टीलचे डस्टबिन आता रहस्यमयरीत्या गायब झाले आहेत. तब्बल २ कोटी २१ लाख ४० हजार रुपये खर्च करून शहरभर उभारलेल्या १२०० कचरापेट्यांपैकी बहुतांश ठिकाणी आज फक्त लोखंडी स्टैंड उभे दिसत आहेत. डस्टबिन नाहीत, पण त्याच जागी कचऱ्याचे ढीग मात्र पुन्हा वाढू लागले आहेत.

सिव्हिल शहरातील लाइन्स, वेस्ट हायकोर्ट रोड, सक्करदरा, मानेवाडा, खामला अशा अनेक भागांत डस्टबिनची वाताहत झाली आहे. डस्टबिन गायब झाल्याने नागरिक त्याच ठिकाणी कचरा फेकत असल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांपुढे नवे आव्हान उभे झाले आहे. संपूर्ण शहरातील ९९ टक्के कचरापेट्या चोरीला गेल्या फक्त त्याचे स्टँड दिसत आहे. काही दिवसांनी हे स्टैंडसुद्धा गायब होतील.

"एखादी कचरापेटी चोरी गेली हे समजू शकते, पण संपूर्ण शहरातील कचरापेट्या चोरी जाणे म्हणजे कुंपणच शेत खाते अशी अवस्था झाली आहेत. कित्येक तक्रारी केल्या, पण प्रशासन लक्ष देत नाही व कोट्यवधी रुपयांच्या कचरापेट्या चोरी जातात, पण चौकशी होत नाही. आतापर्यंत शहरात नगरसेवक नव्हते. आता नवीन नगरसेवक यांनी हा ज्वलंत प्रश्न सभागृहात उपस्थित करावा व चोर कोण हे पुढे आणावे."
- विलास ठोसर, सहसचिव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, नागपूर
 

Web Title : नागपुर: दो करोड़ के डस्टबिन गायब, कचरे के ढेर!

Web Summary : नागपुर में दो करोड़ रुपये के स्टेनलेस स्टील के डस्टबिन रहस्यमय ढंग से गायब हो गए हैं, जिससे कचरे के ढेर बढ़ रहे हैं। नागरिक और कार्यकर्ता कार्रवाई की कमी से निराश हैं और गायब डिब्बे की जांच की मांग कर रहे हैं।

Web Title : Nagpur's Two Crore Rupee Dustbins Vanish; Garbage Piles Up!

Web Summary : Nagpur's stainless steel dustbins, costing ₹2 crore, have mysteriously disappeared, leaving only stands and increasing garbage piles. Citizens and activists are frustrated by the lack of action and demand an investigation into the missing bins.