शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

नागपुरात बंददरम्यानदेखील काँग्रेसमध्ये गटबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:23 AM

राफेल करार व इंधन दरवाढीवरून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’साठी काँग्रेसचे नेते एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारविरोधातील या आंदोलनातदेखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली. मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर गैरवर्तवणुकीचा आरोप लावला. वनवे यांनी ठाकरे यांच्याविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी यात केला आहे. दुसरीकडे विकास ठाकरे यांनी आरोपांचे खंडन केले असून वनवे तर आंदोलनात कुठे दिसलेच नसल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्दे‘रॅली’दरम्यान जीवे मारण्याची धमकी दिली :तानाजी वनवे यांचा शहराध्यक्ष ठाकरेंवर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राफेल करार व इंधन दरवाढीवरून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’साठी काँग्रेसचे नेते एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारविरोधातील या आंदोलनातदेखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली. मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर गैरवर्तवणुकीचा आरोप लावला. वनवे यांनी ठाकरे यांच्याविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी यात केला आहे. दुसरीकडे विकास ठाकरे यांनी आरोपांचे खंडन केले असून वनवे तर आंदोलनात कुठे दिसलेच नसल्याचे म्हटले आहे.‘भारत बंद’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी शहर काँग्रेसतर्फे रामनगरहून ‘रॅली’ काढण्यात आली. यात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी खासदार मुकुल वासनिक, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अ.भा.काँग्रेस कमेटीच्या ‘एससी सेल’चे अध्यक्ष नितीन राऊत, माजी मंत्री राजेंद्र मुळक हे सहभागी झाले होते. या ‘रॅली’मध्ये सहभागी होण्यासाठी मीदेखील रामनगर येथे पोहोचलो. मात्र गोकुळपेठ येथे पोहोचल्यावर ठाकरे यांनी मला धक्का मारला. तसेच येथे कुणी बोलविले आहे व का आले आहात असा प्रश्न विचारला. येथून निघून जा, अन्यथा जीवे मारून टाकील, अशी धमकी ठाकरे यांनी दिली, असा आरोप वनवे यांनी लावला. यानंतर वनवे ‘रॅली’तून बाहेर पडले व अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. उल्लेखनीय आहे की शहर काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण सुरू आहे. एका बाजूला मुत्तेमवार-ठाकरे तर दुसऱ्या बाजूला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व त्यांचे समर्थक आहेत. चतुर्वेदी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, मात्र पक्षातील अंतर्गत राजकारणात त्यांच्या समर्थकांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. वनवे हे त्याच गटातील आहेत.यशस्वी बंदमुळे विरोधी घाबरलेविकास ठाकरे यांना या आरोपांबाबत विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोपांचे खंडन केले. सोमवारी वनवे कुठेही दिसलेच नाहीत. ‘भारत बंद’ नागपुरात यशस्वी झाला. त्यामुळे विरोधी घाबरले आहेत. भाजपच्या इशाºयावर असे तथ्यहीन आरोप लावले जात आहेत, असे ठाकरे म्हणाले. मी पश्चिम नागपुरातून विधानसभा निवडणूक लढलो आहे. त्यामुळेच राजकुमार कमनानी यांनी काढलेल्या ‘रॅली’त मी सहभागी झालो. वनवे यात सहभागीच झाले नव्हते. पक्षाचे इतरही वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. त्यांनादेखील विचारले जाऊ शकते, असा दावादेखील ठाकरे यांनी केला.

 

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर