शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपचारात वापरलेले औषध लवकरच मेडिकलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 11:07 PM

Donald Trump's treatment drug अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असताना देण्यात आलेल्या ‘कॅसिरिव्हीमॅब’ व ‘इमदेव्हीमॅब’ या ‘अँटिबॉडी कॉकटेल’ची ४५ इंजेक्शन्स नागपूरच्या मेडिकलला लवकरच प्राप्त होणार आहेत.

ठळक मुद्दे ‘अँटिबॉडी कॉकटेल’ची ४५ इंजेक्शन्स मिळणार: चिंताजनक होण्याआधीच उपचार!

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असताना देण्यात आलेल्या ‘कॅसिरिव्हीमॅब’ व ‘इमदेव्हीमॅब’ या ‘अँटिबॉडी कॉकटेल’ची ४५ इंजेक्शन्स नागपूरच्या मेडिकलला लवकरच प्राप्त होणार आहेत. या ‘कॉकटेल’मुळे कोरोनाच्या रुग्णाला रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासत नसल्याची आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वैद्यकीय सेवा उघड पडल्या. यात रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे रुग्णसेवा अडचणीत आली होती. प्रशासनाला यात लक्ष घालून स्वत:कडे पुरवठ्याची जबाबदारी घ्यावी लागली. परंतु या इंजेक्शनला घेऊन तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. यामुळे नुकतेच अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असताना देण्यात आलेला ‘अँटिबॉडी कॉकटेल’चा डोस चर्चेत आला. या इंजेक्शनमुळे ते लवकर बरे झाल्याने सर्वांचे लक्षही वेधले गेले. या औषधाला भारताच्या ‘केंद्रीय औषध प्रमाण नियंत्रक संस्था’ म्हणजेच ‘सीडीएससीओ’ने नुकतीच आपत्कालीन मंजुरी दिली. यामुळे देशातील आघाडीची रुग्णालये व कोविड केंद्रावर औषधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्याअनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने नागपूर मेडिकलला मंगळवारी पत्र पाठवून, पुणे येथील कार्यालयातून ‘अँटिबॉडी कॉकटेल’चे ४५ व्हायल घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मेडिकल प्रशासनाने त्यासंदर्भातील तयारी सुरू केली आहे.

 रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही!

तज्ज्ञांच्या मते, या ‘कॉकटेल’ औषधीमुळे रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासत नाही, असे म्हटले जाते. असे झाल्यास, आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे. रुग्णाची परिस्थिती चिंताजनक होण्याआधीच उपचार करण्यासाठी मदत होईल. ‘अँटिबॉडी कॉकटेल’चा वापर मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी केला जाऊ शकतो. १२ वर्षांपासून पुढील वयोगटातील रुग्णांना हा डोस देता येतो. कोरोनाची गंभीर लक्षणे उद्भवत असताना हा डोस घेतल्यास यामुळे ऑक्सिजन पातळी कमी होत नाही, असे संबंधित कंपनीचे म्हणणे आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पmedicineऔषधं